Nashik Crime : नाशिक (Nashik) शहरात दिवसेंदिवस गुन्हेगारी (Crime) वाढत असून आता घरगुती वादही वाढत चालले आहेत. यातून पती पत्नीचा वाद टोकाला जाऊन टोकाच्या घटना घडत असल्याचे समोर येत आहे. अशातच नाशिक शहरातील अंबड परिसरात (Ambad Area) धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील उद्योजकाने पत्नीवर प्राणघातक हल्ला (attack) करत 19 वर्षीय मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेनंतर उद्योजकाचाही मृत्यू झाल्याने या प्रकाराबाबत परिसरात खळबळ उडाली आहे. 

नाशिक शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडल्याचे वारंवार घडणाऱ्या घटनांमधून दिसून येत आहे. गुन्हेगारी (Crime Rate) वाढत चालली असून कौटुंबिक वादही शिगेला पोहचले आहेत. अशातच अंबड परिसरात विचित्र घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आशिष जगदीश कौशिक हे उद्योजक असून त्यांची पत्नी ज्योती व मुलगा देवसह अश्विननगर येथे शिव बंगल्यात राहतात. गुरुवारी सकाळी साडे सहा वाजण्याच्या सुमारास देव त्याच्या खोलीत झोपलेला असताना त्याच्या उजव्या हातावर अचानक हत्याराने वार झाल्याने तो जागा झाला. यावेळी त्याला त्याचे वडील आशिष यांच्या हातात चाकू दिसला. त्यांनी त्याच्यावर वार करण्याचा प्रयत्न केला.

त्यानंतर देवने तेथून पळ काढत आईच्या खोलीत जाऊन दरवाजा आतून बंद केला. त्यावेळी त्याला आईसह ज्योती पलंगावर जखमी अवस्थेत पडल्याचे दिसून आले. त्याचबरोबर संपूर्ण गादी रक्ताने भरल्याचे दिसून आले. त्याने तातडीने घडलेला प्रकार वडिलांच्या मित्रांना फोनवर कळविला. देव याच्या उजव्या हाताला जखम झाली असून वडील आशिष कौशिक यांनीच आईवर तसेच आपल्यावर प्राणघातक हल्ला केल्याची तक्रार त्याने दाखल केली आहे. 

आशिष कौशिक यांचाही मृत्यू

दरम्यान या घटनेनंतर आशिष कौशिक यांचाही मृत्यू झाला असून त्यांचा मृत्यू उच्च रक्तदाबामुळे हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने झाल्याचे सांगितले जात आहे. मात्र त्यांनी स्वतः आत्महत्या केली की त्यांची हत्या झाली याविषयी साशंकता व्यक्त होत असल्याने त्याविषयीचा अधिक तपास पोलीस करीत आहेत. प्राथमिक तपासात आशिष कौशिक यांना रक्तदाबाचा त्रास असल्याची माहिती समोर आली. उच्च रक्तदाबाच्या आजाराचे उपचार सुरु होते. मात्र उद्योजकाच्या मृत्यूविषयी विविध चर्चांना उधाण असून अंबड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी अंबड पोलीस पोलिस तपास करीत आहेत.

news reels reels

पत्नी व मुलावर एकाच शस्त्राने वार

उद्योजक आशिष कौशिक यांनी त्यांची पत्नी व मुलावर एकाच शस्त्राने वार केल्याची माहिती समोर आली असून पत्नी ज्योती हिच्यावर प्राणघातक हल्ला केल्यानंतर ते मुलगा देव याच्या खोलीत गेले. त्याच्या उजव्या हातावर त्यांनी वार केला. त्यामुळे जखमी झालेल्या देव झोपेतून खडबडून जागा झाला आणि त्याने स्वत:चा जीव वाचविण्यासाठी त्याच्या आईच्या खोलीत धाव घेत खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यामुळे या घटनेत देव बचावल्याची माहिती पोलिसांनी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here