मलंगवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच निवडीसाठी मिटींग चालू असताना फिर्यादी आणि आरोपी यांच्यात आपसात मतभेद झाले. या मतभेदाचे रूपांतर मारहाणीत झाले. यावेळी आरोपी प्रतीक भोलानाथ पाटील, चेतन भोलानाथ पाटील, विकी भोलानाथ पाटील, शिवाजी पाटील आणि सुनिल चौधरी यांनी शिवीगाळ करत सरपंच तुषार पाटील यांना आणि त्यांचे बंधू बिपीन पाटील तसचे वडील मधुसूदन पाटील यांना देखील मारहाण केली.
दरम्यान, हे प्रकरण पोलीस ठाण्यात पोहचले आणि पोलिसांनी फिर्यादी यांची तक्रार घेत आरोपींवर गुन्हा दाखल केला. याबाबत पोलीस सूत्रांनी सांगितलं की, गैरकायद्याची मंडळी जमवून फिर्यादी यांना शिवीगाळी आणि दमदाठी करून लाथा बुक्क्यांनी मारहाण केली. तसेच फिर्यादी यांचे वडील मधुसुदन पाटील, भाऊ बिपीन पाटील यांना देखील बेदम मारहाण केली आहे. आरोपींनी गैरकायद्याची मंडळी जमा केली म्हणून भा.द.वि. कलम ३२३, ५०४, ५०६, १४३, १४९, १४७ प्रमाणे हिललाईन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, जिल्हा परिषद सदस्य तथा भाजप पदाधिकारी शाम पाटील यांच्या कार्यालयात हा प्रकार घडल्याने याची जोरदार चर्चा सुरू आहे.