रुग्णालयातील अत्याधुनिक नवजात शिशू विभागात या बाळाला दाखल करण्यात आले. नवजात शिशु तज्ञ डॉ. निवेदिता पाटील व न्युरो सर्जन डॉ. उदय घाटे यांनी ही गाठ शस्त्रक्रिया करून काढण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयाला पालकांनीही संमती दिली. त्यानुसार १३ मार्च रोजी भूलतज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने या बाळाला भूल दिली आणि न्यूरो सर्जन डॉ. उदय घाटे यांनी यशस्वी शस्त्रक्रिया करून ही गाठ काढली. त्यानंतर या बाळाला पुन्हा नवजात शिशु अतिदक्षता विभागात दाखल केले. 5 दिवसात बाळ पूर्ण बरे झाले असून त्याला आईकडे सुपूर्द करण्यात आले.
डॉ. डी. वाय पाटील हॉस्पिटलमध्ये रोटरी क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजच्या सहकार्याने अत्याधुनिक व अद्ययावत असा ३० बेडचा नवजात शिशु अतिदक्षता विभाग सुरु करण्यात झाला आहे. जोखमीचे व अत्यंत जोखमीचे नवजात बालक, कमी दिवसाचे, कमी वजनाचे नवजात शिशू यावर या विभागात सर्व आत्याधुनिक उपचार अत्यंत कमी खर्चात केले जातात. गरजू रुग्णांना अशी सेवा देण्यात रुग्णालय व येथील प्रशासन डॉक्टर्स नेहमीच पुढे असतात.
अधिष्ठाता डॉ. राकेश कुमार शर्मा, वैद्यकीय अधीक्षिका डॉ. वैशाली गायकवाड, बाल रोग विभागप्रमुख डॉ. अनिल कुरणे, भूलविभाग प्रमुख डॉ. संदीप कदम यांचे या शस्त्रक्रियेसाठी मोठे सहकार्य लाभले. कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ. राकेश कुमार मुदगल, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी या बळावर यशस्वी शस्त्रक्रिया व उपचार करणाऱ्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.
ऋतुराज पाटलांना पाहताच महिलांचा गराडा, रंग लावत आमदारासोबत भन्नाट डान्स