म. टा. प्रतिनिधी, कोल्हापूरः बांधकाम व्यावसायिकांची क्रीडाई संस्था आणि रोटरी संस्थेने पुढाकार घेऊन कोल्हापुरातील महासैनिक दरबार हॉल येथे १२५ खाटांचे कोविड सेंटर तयार केले. या सेंटरचे लोकार्पण पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी करण्यात आले. दरम्यान, या दोन्ही संस्थांकडून एकूण ५३८ खाटांची व्यवस्था केली जाणार आहे.

करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने पालकमंत्री सतेज पाटील यांनी कोविड उपचार केंद्रांच्या निर्मितीसाठी सामाजिक संस्थांनी पुढे येण्याचे आवाहन केले होते. यानुसार बांधकाम व्यावसायिकांची क्रीडाई संस्था आणि रोटरी संस्थेने खाटांची सुविधा देण्याची तयारी दर्शवली. यासाठी रोटरीच्या बारा क्लबनी एकत्र येऊन ६२ लाख रुपयांची निधी जमा केला. क्रीडाईनेही यात भर घालून जिल्हा प्रशासनाला मदतीचा हात दिला. यातून ५३८ खाटांच्या रुग्णालयांची व्यवस्था केली जाणार आहे. सर्व खाटांसाठी व्हेंटिलेटरची सुविधा देण्याचीही तयारी क्रीडाईने दर्शवली आहे. यापैकी १२५ खाटांचे कोविड सेंटर महासैनिक दरबार हॉलमध्ये तयार केले आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते रविवारी या सेंटरचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी बोलताना पालकमंत्री पाटील यांनी क्रीडाई आणि रोटरीच्या कामाचे कौतुक करीत यापुढे ग्रामीण भागातही आरोग्य सुविधा पुरवाव्यात, असे आवाहन केले. यावेळी महापौर निलोफर आजरेकर, आमदार चंद्रकांत जाधव, जिल्हाधिकारी दौलत देसाई, महापालिका आयुक्त डॉ. मल्लिनाथ कलशेट्टी, क्रीडाईचे राज्याचे अध्यक्ष राजीव परीख, जिल्हाध्यक्ष विद्यानंद बेडेकर, रोटरीचे डिस्ट्रीक्ट गव्हर्नर संग्राम पाटील, सचिव ऋषिकेश केसकर, रोटरी मुव्हमेंटचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील-बुद्धीहाळकर आदी उपस्थित होते.

रुग्णांना तात्काळ उपचार मिळणार

करोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने रुग्णालयांवरील ताण वाढला आहे. उपचारासाठी खासगी रुग्णालयेही आरक्षित केली आहेत. मात्र, रुग्णांच्या वाढणा-या संख्येच्या तुलनेत खाटांची व्यवस्था करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर निर्माण झाले आहे. खासगी संस्थांच्या मदतीने प्रशासनाला काही प्रमाणात दिलासा मिळाला. याशिवाय रुग्णांना तातडीने उपचार मिळण्यातही मदत झाली.

Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times

5 COMMENTS

  1. Hi there, after reading this amazing paragraph i am as well delighted to share my knowledge here with friends.

  2. I learn something new and challenging on blogs I stumbleupon everyday.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here