atm robbery live video, थंडगार एटीएममध्ये चोरट्याला घाम फुटला; मांडी घालून बसला, तासाभरात थकला; अखेर… – thief try to robbed atm but he failed after 2 hours of attempt video goes viral jalgaon news
जळगाव: जळगाव शहरातील रिंगरोड येथील बँक ऑफ बडोदा येथील एटीएम मशीन अज्ञात चोरट्याने फोडण्याचा प्रयत्न केला. ही घटना बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास घडली आहे. ही घटना आणि चोरटा सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. तब्बल एक ते दोन तास चोरट्याने एटीएम फोडण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, शेवटी एटीएममध्ये असलेली रोख रक्कम चोरट्याला चोरता आली नाही. अखेर वैतागून चोरटा आल्या मार्गाने परत निघून गेला.
जळगाव शहरातील रिंगरोडवर बँक ऑफ बडोदा या बँकेची एटीएम मशीन लावण्यात आली आहे. एटीएमच्या बाजूलाच बँकेची शाखा देखील आहे. बुधवारी रात्री ११.३० वाजेच्या सुमारास एक अज्ञात चोरटा एटीएम मशीनच्या कॅबीनमध्ये शिरला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सीसीटीव्ही व्हिडीओनुसार, त्याने सुरूवातीला एटीएम मशीनच्यामागील बाजूची पाहणी केली. त्यानंतर समोरच्या बाजूच्या खालचा लॉक असलेला पत्रा हाताने उघडला. त्यानंतर एटीएम हाताने तोडण्याचा प्रयत्न करत रोख रक्कम असलेले ड्रॉव्हर चोरट्याकडून उघडलेच नाही. एटीएम मशीन फोडण्यात अयशस्वी झाल्याने चोरटा घटनास्थळाहून पसार झाला आहे.
जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी समाधान पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी पाहणी केली. तसेच, त्यांनी या ठिकाणचे एटीएममधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून पुढील चौकशीला सुरूवात करण्यात आली आहे. घटनेचा पुढील तपास पोलीस नाईक संदीप पाटील हे करीत आहेत.