कोल्हापूर : नागपूरच्या एका प्रेयसीने कोल्हापुरातील युवकाला लग्नाला नकार दिल्याने युवकाने कीटकनाशक पिऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. विवेक शर्मा (वय ३०, रा. इचलकरंजी) असं या युवकाचं नाव आहे. नागपूरच्या मुलीने लग्नास नकार दिल्याने विवेकने कोल्हापुरातील सासने मैदान येथे असणाऱ्या बागेत आत्महत्या केली.

कामासाठी जात असल्याचे सांगून विवेक घराबाहेर पडला होता. गुरुवारी (१६ मार्च) रात्री त्याने सासने मैदानाजवळच्या एका बागेत विषारी औषध प्राशन करत इचलकरंजी येथे राहणाऱ्या विवेकने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली. विवेकचे नागपूरमधील एका मुलीसोबत प्रेम प्रकरण सुरू होते. दरम्यान, प्रेयसीने त्याला लग्नासाठी नकार दिल्याने नाराज होत कामासाठी जातो, असं सांगत घराबाहेर पडला.

अकाउंट ऑफिसर होण्याचं स्वप्न अधुरं, भरधाव टिप्परची धडक अन् कुटुंबाने लाडकी लेक गमावली
दरम्यान, रात्रीच्या सुमारास कोल्हापुरातील सासणे ग्राउंड येथील बागेत कीटकनाशकाचे औषध प्राशन करुन त्याने आत्महत्या केली. दरम्यान, परिसरातील नागरिकांना याची माहिती मिळताच त्याला तातडीने उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल केलं. मात्र, प्रकृती गंभीर असल्याने नंतर खासगी रुग्णालयात विवेकला नेण्यात आले. मात्र, उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. विशेष बाब म्हणजे, उपचार सुरू असताना विवेकने प्रेयसीने लग्नासाठी नकार दिल्याने आपण हे पाऊल उचलल्याचे सांगितलं.

महाराष्ट्र कर्नाटकात पुन्हा वादाची ठिणगी? शिंदे सरकारच्या निर्णयावर बोम्मईंना आक्षेप, शाहांकडे तक्रार करणार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here