मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत नाशिकहून मुंबईकडे येणाऱ्या शेतकऱ्यांच्या लाँग मार्चच्या शिष्ठमंडळासोबत झालेल्या चर्चेची आणि निर्णयांची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या शिष्ठमंडळासोबत बैठक झाली, त्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, संबंधित मंत्री आणि जे.पी. गावित आणि शिष्टमंडळ यांच्यात सकारात्मक चर्चा झाली. हे सरकार अत्यंत संवेदनशील असून सकारात्मक भूमिका घेतल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

शेतकऱ्यांच्या, आदिवासींच्या अनेक वर्षांच्या मागण्या होत्या. आदिवासी बांधव ज्या जमिनी कसतात, त्यापैकी ४ हेक्टरपर्यंतची जमीन कसणाऱ्यांच्या नावे लावावी, गायरान जमिनीवर घरं आहेत ती त्यांच्या नावावर करावी यासह छोट्या मोठ्या मागण्या होत्या, असं एकनाथ शिंदे म्हणाले. वनजमिनीवरील अतिक्रमण रोखण्यास प्रतिबंध रोखण्यासाठी प्रभावी काम करण्यात यावं अशी मागणी होती, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

अंगणवाडी सेविकांचं मानधन १० हजार रुपये केलेलं आहे. मिनी अंगणवाडी सेविकांचं मानधन वाढवण्यात आलं आहे. अंगणवाडी सेविकांची २० हजार पदे नियुक्त करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. कंत्राटी कर्मचाऱ्यांचे वेतन थेट त्यांच्या खात्यात जावेत, यासाठी यंत्रणा तयार करणार आहोत. गट प्रवर्तकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.

पेन्शन योजनांच्या रकमेत वाढ करण्यात यावी, अशी त्यांची मागणी होती त्याला देखील सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

कांद्याच्या अनुदानात वाढ करावी, अशी त्यांची मागणी होती. त्यानुसार अनुदान ३०० वरुन ३५० वर नेण्यात आलं आहे, असं एकनाथ शिंदे म्हणाले. गावित यांच्या आंदोलनामध्ये राजकीय नव्हतं हे आपल्याला प्रामाणिकपणे मान्य करावं लागेल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

प्रेयसीचा लग्नास नकार, तरुणाचं टोकाचं पाऊल; मृत्यूच्या दारात असताना म्हणाला…

आपण घेतलेल्या निर्णयांची तातडीनं अंमलबजावणी होईल, याची दक्षता घेतली जाईल, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

महाराष्ट्र कर्नाटकात पुन्हा वादाची ठिणगी? शिंदे सरकारच्या निर्णयावर बोम्मईंना आक्षेप, शाहांकडे तक्रार करणार

एकनाथ शिंदे यांनी जे. पी. गावित यांनी त्यांचं आंदोलन मागं घ्यावं असं आवाहन केलं. गावित यांनी आंदोलन मागं घ्यावं असं विनंती वजा आवाहन करत असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी केलेल्या आवाहनानंतर शेतकऱ्यांचं लाल वादळ परत जाणार की आंदोलन सुरु ठेवणार याकडे लक्ष लागलं आहे.

चेंडू टाकतोय की आगीचा गोळा… मिचेल स्टार्क झटपट तीन बळी घेण्यात का ठरला यशस्वी पाहा…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here