मुंबई : ब्रेकअप झाल्यानंतर बरेचदा तरुण ‘देवदास’ झाल्याचं पाहायला मिळतं. गर्लफ्रेण्डवर पैसे उडवून आधीच खिशाला कात्री लागलेली असते. त्यातच मन उदासवाणं. कोणी दर्दभरी गाणी ऐकत बसतं, तर कोणी कवितांच्या माध्यमातून दुःखाला वाट मोकळी करुन देतं. कधी अरबट चरबट खाण्या-पिण्यापासून सिगरेट-दारुपर्यंत नको नको त्या व्यसनांची वाट धरली जाते. तरुणींची गतही काही वेगळी नसते. आपल्या प्रियकराच्या आठवणीत त्याही पार खंगून जातात. मात्र ब्रेकअपनंतर एक तरुण मालामाल झाला आहे. कारण आपल्याला २५ हजार रुपयांचा लाभ झाल्याचा दावा तरुणाने सोशल मीडियावर केला आहे.

प्रतीक आर्यन नावाच्या ट्विटर युझरने आपल्या ब्रेकअपची कहाणी सोशल मीडियावर शेअर केली आहे. प्रेयसीसोबत ब्रेकअप केल्यानंतर २५ हजार रुपये मिळाल्याचा दावा त्याने केला आहे. प्रतीकचे म्हणणे आहे की, त्याच्या प्रेयसीने फसवणूक केली, म्हणून त्याला ‘हार्टब्रेक इन्शुरन्स फंड’ अंतर्गत ही घसघशीत रक्कम मिळाली.

परस्पर संमतीने ब्रेकअप करण्याची परिस्थिती निर्माण झाली, तेव्हा प्रतीक आणि त्याच्या एक्स गर्लफ्रेण्डला ‘हार्टब्रेक इन्शुरन्स फंड’ ची कल्पना सुचली. याअंतर्गत दोघेही दरमहा प्रत्येकी ५०० रुपये जॉइंट अकाउंटमध्ये जमा करायचे. ज्याची आधी फसवणूक होईल, त्याला हे सर्व पैसे मिळतील, असे दोघांमध्ये ठरले.

नवऱ्याने अचानक ब्रेक दाबला न् ती कोसळली, २४ वर्षीय नवविवाहितेचा पतीच्या डोळ्यादेखत मृत्यू
प्रतीकच्या ट्वीटला अल्पावधीतच मोठा प्रतिसाद मिळाला आहे. आठ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळालेल्या या ट्वीटला ९४० पेक्षा जास्त रिट्वीट्स, तर साडेबारा हजारांहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. यावर असंख्य युझर्सनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. मात्र प्रतीकने हे खरंच सांगितलं आहे, की तो केवळ मस्करीत हे म्हणतोय, हे स्पष्ट झालेलं नाही.

‘हाफ’तिकीटाचे आदेश; स्वारगेट बस डेपोत एकमेकांना पेढे भरवत महिलांनी आनंद साजरा केला

“माझ्या गर्लफ्रेण्डने फसवणूक केल्यामुळे मला २५ हजार रुपये मिळाले. आम्ही रिलेशनशीपमध्ये अडकल्यापासून दर महिन्याला जॉईंट अकाऊण्टमध्ये ५०० रुपये टाकत गेलो. त्यावेळी आमच्यात करार झाला, की ज्याची फसवणूक होईल, त्याला खात्यातील सर्व रक्कम मिळेल. हाच हार्टब्रेक इन्शुरन्स फंड” अशा आशयाचं ट्वीट प्रतीकने केलं आहे.

मुलींना असे का वाटते की त्यांनाच रिलेशनशीपमध्ये हार्टब्रेक इन्शुरन्स फंडचा लाभ मिळू शकतो. ही पॉलिसी फक्त निष्ठावान लोकांसाठी आहे, असंही प्रतीक म्हणतो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here