चंद्रपूर : ‘एकच मिशन, जुनी पेन्शन’ असा नारा देत सरकारी, निमसरकारी कर्मचाऱ्यांसह शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी एकजूट दाखवून संप सुरु केला.त्यातच आमदार, खासदार यांच्या पेन्शनचा प्रश्न समाजमाध्यमात चर्चिला जात आहे. काँग्रेसचे महाराष्ट्रातील एकमेव खासदार बाळू धानोरकर यांनी आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांचं निवृत्ती वेतन बंद करा, अशी मागणी केली आहे. या मागणीने राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. राज्यसभा आणि लोकसभेचे मिळून ४७९६ माजी खासदार आहेत. त्यांना ५० कोटी रुपये पेन्शनच्या माध्यमातून जात असतात, अशी माहिती खासदार धानोरकरांनी दिली.

भारत सरकारच्या माध्यमातून राज्यसभा आणि लोकसभेच्या माजी खासदारांना निवृत्ती वेतन लागू आहे. यामध्ये आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या अनेक व्यक्तींना निवृत्ती वेतनाचा लाभ दिला जात आहे. यामध्ये माजी खासदारांची आर्थिक स्थिती बघून निवृत्ती वेतन देण्यात यावी, अशी मागणी चंद्रपूरचे काँग्रेसचे खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी व अर्थमंत्री निर्मला सीतारामनजी यांना पत्रही पाठवले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

शेतात काम करत होते, अचानक आभाळातून संकट कोसळलं अन् क्षणात दोघांनी जीव गमावला

भारताच्या संसदेत लोकसभा आणि राज्यसभेमध्ये एकूण ४७९६ माजी खासदार आहेत. त्यांना दरवर्षाला ५० कोटी रुपयांची रक्कम पेन्शनच्या माध्यमातून प्रदान केली जाते. यामध्ये जवळपास ३००0 माजी खासदारांचे आश्रित परिवार देखील सहभागी आहेत. माजी खासदारांना देण्यात येणाऱ्या निवृत्तीवेतनामध्ये उद्योजक राहुल बजाज, संजय दालमिया, मायावती, सिताराम येचुरी, मनी शंकर अय्यर, रेखा, चिरंजीवी आणि अनेक मोठ्या श्रीमंत व्यक्तींचा समावेश आहे. आर्थिक दृष्ट्या संपन्न असलेल्या माजी खासदारांची निवृत्ती वेतनाची रक्कम बंद करण्यात यावी, अशी मागणी खासदार बाळू धानोरकर यांनी केली आहे.

अमृता फडणवीसांना लाचेची ऑफर प्रकरण, आरोपी अनिक्षाच्या पित्याचा ठाकरेंसोबत फोटो चर्चेत

कर्मचाऱ्यांच्या संपामुळं आमदारांच्या पेन्शनचा मुद्दा चर्चेत

महाराष्ट्रातील राज्य सरकारी कर्मचारी जुन्या पेन्शनच्या मागणीसाठी संपावर गेलेले आहेत. कर्मचाऱ्यांच्या संपाच्या निमित्तानं आमदारांच्या पेन्शनचा मुद्दा देखील चर्चेत आला आहे. आमदारांना जर पेन्शन मिळत असेल तर कर्मचाऱ्यांना देखील जुनी पेन्शन मिळाली पाहिजे, अशी मागणी करण्यात येत आहे.

भारताचे फलंदाज धारातिर्थी पडत असताना लोकेश राहुल कसा यशस्वी ठरला, जाणून घ्या एकमेव कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here