वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आयसीसीच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्या विरोधात जारी करण्यात आलेल्या अटक वॉरंट ही सुरुवात असल्याचं झेलेन्स्की म्हणाले. आंतरराष्ट्रीय क्रिमिनल कोर्टानं रशियानं केलेल्या आक्रमणासंदर्भात न्यायाच्या दिशेनं पडलेलं पहिलं पाऊल असल्याचं म्हटलं आहे.
व्लादिमीर पुतीन यांच्या आदेशानं २४ फेब्रुवारी २०२२ ला रशियानं यूक्रेनविरुद्ध लष्करी कारवाई सुरु केली होती. त्यावेळी यक्रेन रशियासमोर शरणागती पत्करेल असं अनेकांना वाटलं होतं. मात्र, रशियाला जे अपेक्षित होतं तसं घडलेलं नाही. यूक्रेननं मोठ्या ताकदीनं रशियन आक्रमणाला उत्तर दिलं.
अमृता फडणवीस यांना धमकी, देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत सांगितलं नेमकं काय घडलं
रशियाचे माजी राजनैतिक अधिकारी बोरिस बोन्डारेव यांनी पुतीन युद्ध जिंकण्यात अपयशी ठरले तर त्यांचं पद सोडण्यास भाग पाडलं जाईल, असं म्हटलं. गेल्या वर्षी रशियानं यूक्रेनवर हल्ला केल्यानंतर बोन्डारेव यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा दिला होता. ते जिनेव्हामध्ये रशियाच्या राजनैतिक मिशनमध्ये आर्म्स कंट्रोल एक्सपर्ट म्हणून काम करत होते. पुतीन हे काही सुपरहिरो नाहीत, त्यांच्याकडे कसलिही सुपवपॉवर नाही, ते एक साधारण हुकुमशाह आहेत, त्यांना पदावरुन हटवता येऊ शकतं, असं ते म्हणाले.
चीननं गेल्या काही महिन्यांपूर्वी इराण आणि सौदी अरेबिया यांच्यातील दुश्मनी मिटवली आहे. त्यानंतर चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांनी रशिया आणि यूक्रेन यांच्यातील गेल्या वर्षभरापासून सुरु असलेलं युद्ध संपुष्ठात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत.
येत्या सोमवारी शी जिनपिंग दोन दिवसांच्या रशियाच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यूक्रेन आणि रशिया यांच्यातील युद्धाचा शेवट कधी होणार याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची प्रतिष्ठा या युद्धामुळं पणाला लागली आहे. रशिया आणि यूक्रेन युद्धाचा जगभरातील विविध देशांवर देखील परिणाम झाला आहे.