VIDEO : ओव्हरटेक करण्यावरून वाद, आरोपी कार चालकाने महिलेला केली मारहाण; व्हिडिओ व्हायरल – nagpur crime news the accused car driver beat up the woman due to a dispute over overtaking
नागपूर : काही दिवसांपूर्वीच महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला. मात्र, महिला दिनाला काही दिवस उलटताच नुकतीच भर चौकात लाजीरवाणी घटना घडली आहे. माणूस इतका असंवेदनशील आणि असहिष्णू कसा होऊ शकतो, असा प्रश्न या घटनेवरून पडला आहे अशी घटना नागपूरात घडली आहे. ती घटना म्हणजे केवळ कारला ओव्हरटेक केलं म्हणून, राग आलेल्या एका व्यक्तीने एका महिलेला मारहाण केली आहे. या घटनेचा नागपुरात निषेध होऊ लागला आहे.
जरीपटका पोलीस ठाण्यांतर्गत ओव्हरटेक करण्यावरून महिला आणि टॅक्स चालकामध्ये वाद झाला. वाद इतका वाढला की आरोपी आणि महिला यांच्या मध्ये हाणामारी ही झाली. शिवशंकर श्रीवास्तव असे आरोपी कार चालकाचे नाव आहे. ही घटना दुपारी एक वाजता इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर घडली. पीडित महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे. मुंबईकडे निघालेल्या लाँग मार्चमध्ये घडली हृदयद्रावक घटना, पायी चालताना वाटू लागले अस्वस्थ, शेतकऱ्याचा मृत्यू मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी कार चालक इंदोरा चौकातून भीम चौकाकडे जात होता. दरम्यान, मागून दुचाकीवरून येणाऱ्या महिलेने त्याला ओव्हरटेक केले. महिलेच्या पुढे गेल्याने आरोपी कार चालकाने तिला शिवीगाळ केली. हे ऐकून महिला गाडीतून खाली उतरली आणि आरोपीशी वाद घालू लागली.
दोघांमध्ये सुरू झालेला वाद इतका वाढला की हे प्रकरण हाणामारीपर्यंत पोहोचले. आरोपीने कारमधून खाली उतरून महिलेवर हल्ला केला. आरोपीने महिलेच्या तोंडावर अनेक वार केले. त्याचवेळी त्याने तिचे केस धरून ओढले. हा प्रकार पाहून आजूबाजूच्या लोकांनी आरोपीला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने महिलेला मारहाण सुरूच ठेवली. लोकांनी मोठ्या प्रयत्न करून महिलेला वाचवले.दरम्यान, जरीपटका पोलिस ठाण्यात आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.