leopard attack pune, Pune : थरारक घटना! मित्रासोबत गुरे आणण्यासाठी गेला, बिबट्याच्या हल्ल्यात तरुणाचा मृत्यू – youth died in leopard attack in khed taluka pune
खेड, पुणे : बिबट्यांचे हल्ले दिवसेंदिवस वाढत आहेत. मानवी वस्तीकडे बिबट्यांचा वावर वाढल्याने अशा घटना घडत असल्याचे समोर येत आहे. खेड तालुक्याच्या धुवोली गावातून अशीच एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एक माहविद्यालतीन तरुण शेतात गुरे आणण्यासाठी गेला असता त्याच्यावर बिबट्याने हल्ला केला. बिबट्याच्या या हल्ल्यात तरुणाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.
अजय जठार ( वय १७ ) असे मृत्यूमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. अचानक झालेल्या बिबट्याच्या हलल्याने तो घाबरून गेला होता. बिबट्याच्या हल्ल्याच्या या घटनेने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. याबाबत अधिक माहिती मिळाली आहे. खेड तालुक्यातील धुवोली गावात जठार कुटुंब राहते. अजय हा महाविद्यालयात शिक्षण घेत होता. तो शुक्रवारी संध्याकाळी साडेसातच्या सुमारास मित्रा सोबत गुरे आणण्यासाठी रानात गेला होता. मात्र त्याच्या मनातही नसेल की या ठिकाणी बिबट्या आला असेल. तो जनावरे घेऊन जात असताना तिथे झाडीत दबा धरून बसलेल्या बिबट्याने अजय याच्या नरडीचा चावा घेतला. या घटने त्याचा जागेवरच मृत्यू झाला. अजय याने नुकतीच बारावीची परीक्षा दिली होती. Pune : दबक्या पावलांनी आला, नरडं धरलं, बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला; थरारक VIDEO या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली. आता पुढील कारवाई करण्याचे काम सुरू आहे. बिबट्याच्या हल्ल्याची पश्चिम भागातील ही दुसरी घटना आहे. या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या भागात बिबट्याचे वास्तव्य वाढत असून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी वन विभागाने ठोस उपाय योजना करणे गरजेचे असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अन्यथा बिबट्याच्या हल्ल्यात असे अनेक नागरिकांचे बळी जातील. यामुळे या भागात पिंजरा लावण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे. वन विभागाने तातडीने आणि ठोस कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. वस्तीत घुसून कुत्र्यांची शिकार करणारे बिबटे हे टोळीने फिरत असल्याचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यानंतर घराच्या आवारात असलेल्या कुत्र्यावर हल्ला करतानाचा बिबट्याचा व्हिडिओही समोर आला आहे.