आंतरराष्ट्रीय भावानुसार दररोज राष्ट्रीय पातळीवर पेट्रोल-डिझेलच्या किंमतींवर परिणाम होतो. तुमच्या शहरातील किंमती तुम्ही घरबसल्या एका एसएमएसवर जाणून घेऊ शकता. तसेच इतर शहरातील भावही जाणून घेता येतात. सध्या देशात पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील चढउताराचा त्यावर फारसा मोठा परिणाम झालेला नाही.
पेट्रोल आणि डिझेलचा आजचा भाव
सरकारी तेल विपणन कंपन्यांनी गेल्या वर्षी एप्रिल महिन्यात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात अखेरक्षक बदल केला होता. त्यानंतर मे महिन्यात केंद्र सरकारने वाहन इंधनावरील उत्पादन शुल्क कमी केले आणि तेव्हापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर ‘जैसे थे’च आहेत तर या काळात कच्च्या तेलाच्या किमतीत कमालीचा बदल झाला आहे. शनिवारी दिल्लीत पेट्रोल ९६.७२ रुपये प्रति लिटर तर डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर दराने उपलब्ध आहे.
महागड्या पेट्रोल-डिझेलपासून दिलासा कधी?
अकलीकडच्या काळात देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही दिलासा मिळण्याची शक्यता नसल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामागचे कारण म्हणजे गेल्या तिमाहीत क्रूडच्या वाढलेल्या किमतींमुळे तेल कंपन्यांना सुमारे १८ हजार कोटी रुपयाने नुकसान सोसावे लागले होते. आणि हा तोटा भरून काढण्यासाठी त्यांना काही वेळ लागेल. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या दरात दिलासा मिळण्याची आशा नाही. दरम्यान, अमेरिकेतील बँकिंग संकटामुळे कच्च्या तेलाच्या किमती पडल्या असताना येत्या काही दिवसांत हे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कच्च्या तेलाच्या किमती आणखी खाली कोसळण्याची अपेक्षा आहे.
दुसरीकडे, आर्थिक वर्ष २०२३ च्या पहिल्या सहामाहीत तेल कंपन्यांचा तोटा २२,००० कोटी रुपये होता, पण तिसऱ्या तिमाहीनंतर काही सुधारणा झाली. काही सूत्रांचे म्हणणे आहे की तेलाची किंमत प्रति बॅरल ७० डॉलरच्या खाली गेली आणि याच पातळीवर राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती कमी होऊ शकतात.