नवी दिल्ली : तुमचे स्वपन पूर्ण करण्यासाठी पैशाचा मोठा वाट असतो. जर तुमच्याकडे पैसा आहे तर तुमच्या बहुतेक इच्छा सहज पूर्ण होतील. त्यामुळे सर्वच जण येनकेन प्रकारे पैसा कमावू इच्छितात. तुम्ही देखील ओकारी करत असाल आणि पैसे कमावण्यासाठी इतर मार्ग शोधत असाल तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. नोकरी करताना व्यवसाय करणे अवघड असते पण तुम्ही अप्रत्यक्षरित्या व्यवसाय करू शकता. शेअर बाजारात किंवा कोणत्या योजनेत (स्कीम) गुंतवणूक करूनही तुम्ही धनवान होऊ शकता.

महागाई आणि बाजाराच्या मोहात कमावलेला पैसा वाचवणे फार कठीण आहे. तसेच तरुणांमध्ये ही मोठी समस्या असते. प्रत्येकाला आपले स्वप्न करायचे असते. पूर्वीचे लोक खूप विचारपूर्वक खर्च करायचे, पण आजचे पगारदार तरुण पिढी पैसे खर्च करण्यापूर्वी विचार करत नाही. हेच कारण आहे की पगार येताच क्रेडिट कार्डच्या परतफेडीकडे जातो. अशा स्थितीत धनवान कसे व्हायचे? एक मार्ग आहे ज्यातून हे शक्य होऊ शकते. तुम्ही तुमचा पगार क्रेडिट त्यातील काही भाग योजनेत गुंतवा.

फक्त चहा बंद करा अन् करोडपती बना! रोजच्या २० रुपयाने तुमचं नशीब घडेल
कुठे गुंतवणूक करणे फायदेशीर
म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीसाठी इक्विटी म्युच्युअल फंड हा एक चांगला पर्याय आहे. येथे तुम्ही तुमची छोटी बचत SIP द्वारे गुंतवा आणि करोडपती बना. म्युच्युअल फंडात दहा वर्षांच्या दीर्घ कालावधीसाठी एसआयपी केल्यास तुम्हाला किमान १२ टक्के वार्षिक परतावा मिळेल.

गुंतवणूक कशी करायची?
तुम्ही १० वर्षाचे लक्ष्य ठेवून इक्विटी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करू शकता. या काळात गुंतवणूक करून तुम्ही धनवान होऊ शकता. पण हे लक्ष्य साध्य करण्यासाठी तुम्हाला मासिक SIP मध्ये वार्षिक स्टेप-अप पर्यायचा वापर करावा लागेल. स्टेप-अप एसआयपी अशी एक आहे जी तुम्हाला ठराविक कालावधीनंतर एसआयपीमध्ये तुमचे योगदान वाढवू देते. तुम्ही तुमची SIP रक्कम दरवर्षी काही टक्क्यांनी वाढवू शकता. अशाप्रकारे तुम्ही तुमच्या उत्पन्नातील वार्षिक वाढ आणि तुमच्या आर्थिक उद्दिष्टांनुसार SIP रक्कम वाढवू शकता.

SIP मॅजिक! दरमहा ६ हजाराची बचत, काही वर्षांत व्हाल कोट्याधीश; अशी आहे संपूर्ण योजना
… तर बनेल कोटींचा फंड

तुम्हाला १० वर्षात १ कोटी रुपयांचा फंड उभा करायचा असेल तर तुम्ही वार्षिक स्टेप-अप २०% वर ठेवू शकता. SIP कॅल्क्युलेटर नुसार १२% वार्षिक परताव्यासाठी तुम्हाला २१,०० रुपये मासिक SIP सह सुरुवात करावी लागेल. दरमहा २१ हजारांची SIP, १२% परतावा, २० टक्के वार्षिक स्टेप-अप आणि १० वर्षाच्या कालावधीसह तुम्ही १ कोटी रुपयांचा कॉर्पस तयार करू शकता.

एसआयपी कॅल्क्युलेटरनुसार, १० वर्षांनंतर तुमची एकूण गुंतवणुकीची रक्कम रु. ६५,४१,५८८ होईल तर, तुम्हाला ३८,३४,५५६ रुपये परतावा मिळेल. अशा प्रकारे १० वर्षानंतर तुमच्याकइड १,०३,७६,१४४ रुपयांचा निधी तुमच्याकडे जमा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here