या वाहनांच्या धडकेने झालेला प्रचंड आवाज ऐकून आसपासच्या नागरिकांनी लागलीच घटनास्थळी धाव घेतली. यावेळी काहींनी संगमनेर शहर पोलिसांनाही माहिती दिल्याने शहर पोलिसांचे पथक तात्काळ घटनास्थळी पोहोचले. नागरिक व पोलिसांनी चौघाही तरुणांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, त्यातील तिघांचा जागीच मृत्यू झाला होता. तर एकजण अत्यावस्थ असल्याने त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहे.
या अपघातात मयत झालेले तिघेही तरुण संगमनेर शहरापासून अवघ्या सहा किलोमीटर अंतरावर असलेल्या चिखली गावचे रहिवासी आहेत. मयत झालेल्या तरुणांची नावे ऋषिकेश उमाजी हासे (वय २०), सुयोग बाळासाहेब हासे (वय २०) आणि निलेश बाळासाहेब सिनारे (वय २६, तिघेही या. चिखली, ता. संगमनेर) अशी आहेत. तर गंभीर जखमी झालेल्या तरुणाचे नाव संदीप भाऊसाहेब केरे (वय ३२, रा. चिखली) असं असल्याची माहिती शहर पोलिसांकडून देण्यात आली आहे.
या भीषण अपघातात एकाच वेळी तिघा तरुणांचा जागीच मृत्यू झाल्याने चिखलीच्या पंचक्रोशीसह संपूर्ण तालुक्यावर शोककळा पसरली आहे. या घटनेनंतर शहर पोलिसांनी अपघातग्रस्त वाहने ताब्यात घेतली असून दुध टँकरच्या चालकालाही ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पोलिसांकडून पुढील तपास सुरु आहे.
जात धर्म लग्नाचं जळजळीत वास्तव, कंपूशाहीवर रोखठोक मतं, घर बंदूक बिरयानीच्या निमित्ताने दिलखुलास गप्पा