रत्नागिरी : खेडमधील गोळीबार मैदानावर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभा घेतली होती. आता उद्धव ठाकरे यांना प्रत्युत्तर देण्यासाठी उद्या रविवारी खेड येथील याच गोळीबार मैदानात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा होणार आहे. या सभेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह रामदास कदम, उदय सामंत, गुलाबराव पाटील यांच्या तोफा धडाडणार आहेत. हे नेते नेमकं काय बोलणार? याकडे अवघ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे. या जाहीर सभेचा टिझरही लॉन्च करण्यात आला आहे.

‘अफजल खान जसा लाखो लोक घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर चाल करून आला, अगदी तसेच उद्धवजी संपूर्ण महाराष्ट्रातून लोक घेऊन खेडच्या सभेला आले होते’, अशी टीका शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. १९ मार्चला होणारी सभा ही फक्त कोकणवासीयांची असेल आणि तुम्हाला समजेल कोकणी जनता ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व रामदास कदम यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, असा टोलाही रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला आहे.

कोकणातील आमदाराने पश्चिम महाराष्ट्राशी तुलना केली, अजित पवारांनी ताडकन उभं राहत वाक्य मागे घ्यायला लावलं
‘कोकणचा इतिहास असा आहे, ज्याच्या घरी आपण एक ग्लास पाणी पितो त्याची आठवण सुद्धा ठेवतो. ज्या झाडाच्या सावली खाली बसतो त्याची आठवण सुद्धा ठेवतो, असा कोकणचा इतिहास आहे. ही कोकणची संस्कृती आहे. पण भास्कर जाधव सारखी आणि खाल्लेल्या घराची वासे मोजणारी अवलाद जगात कुठेही मिळणार नाही. भास्कर जाधव म्हणजे बेईमानी अवलाद आहे. या आधीच्या विधानसभा निवडणुकीत मी पाच जाहीर सभा घेतल्या. त्यांना निवडून आणलं. पण त्याला एवढा माज आणि मस्ती आहे, तो सापा सारखा आहे. एहसान फरामोश आहे. एका पंचायत समितीच्या निवडणुकीत त्याला आर्थिक मदत पण केली होती. कपडे टेम्पो गाड्या सगळे पंधरा दिवस दिले होते. त्याची जाणीवही त्याला नाही. भास्कर जाधव तो सडक्या मेंदुचा आहे’, अशी बोचरी टीका माजी मंत्री रामदास कदम यांनी केली आहे.

शिमगोत्सवात परंपरेला फाटा; महिलांनी पालखी खांद्यावर घेत नाचण्याचा आनंद लुटला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here