नवी दिल्ली : गेल्या काही दिवसांपासून भारतीय शेअर बाजारात तेजी-मंदीचे सत्र सुरु आहे. अजूनही अदानी समूहातील घसरणीतून बाजारात सावरलेला नव्हता की आता समोर एक नवीन संकट उभं टाकलं आहे. या कळत सलग पाच दिवसांच्या घसरणीनंतर गुरुवारी देशांतर्गत मार्केट काहीशा वाढीसह क्लोज झाले. तर शुक्रवारी बाजारात खऱ्या अर्थाने तेजी परतली. मात्र, अमेरिका आणि युरोपमधील संकट आणखी गडद होण्याच्या शक्यतांमुळे आगामी काळातही शेअर बाजारातील घसरण कायम राहील असा अंदाज वर्तवला जात आहे.

गुंतवणुकीची उत्तम संधी! अंबानींचा रॉकेटसिंग शेअर तोंडघशी आपटला, खरेदी करावा?
मार्केटमध्ये लोक उत्कृष्ट परतवा मिळेल, ये हेतून गुंतवणूक करतात मात्र त्यांना नुकसानीचा ही सामना करावा लागतो. गेल्या काही काळातील बाजाराच्या अस्थिरतेत गुंतवणूकदारांना तोटा झाला असला तरी काही शेअर्सनी नक्कीच त्यांना कमाई करू दिली आहे. बाजाराच्या चढउताराच्या काळात शुक्रवारच्या व्यवहारादरम्यान आयटी कंपनी KPIT टेक्नॉलॉजीसचे शेअर्सनी ७% उसळी घेतली आणि शेअर बीएसईवर ८७४.९५ रुपयांवर पोहोचला होता. तर दिवसाखेर स्टॉक ६.७२ टक्क्यांनी वाढून ८७०.१५ रुपयांवर क्लोज झाला. शेअरचा ५२ आठवड्यांचा उच्चांक ८७६ रुपये आहे, जो त्याने महिनाभरापूर्वी नोंदवला होता.

महत्त्वाची बातमी! रामदेव बाबांना मोठा धक्का, एक्सचेंजेसकडून मोठी कारवाई; जाणून घ्या कारण
शेअरची कामगिरी
गेल्या तीन वर्षात कंपनीच्या शेअर्समध्ये १३ पट वाढ झाली असून स्टॉकने १२४८ टक्क्यांनी उसळी घेतली तर बीएसई सेन्सेक्स ८९ टक्क्यांनी वधारला आहे. दरम्यान, दोन दिवसांपूर्वी कंपनीने होंडासोबत भागीदारीची घोषणा केली. तसेच ऑक्टोबर-डिसेंबर तिमाहीत कंपनीच्या महसुलात मागील वर्षाच्या तुलनेत ४७.४ टक्क्यांनी वाढ नोंदवण्यात आली. याशिवाय कंपनीचा बहुतांश महसूल नाविन्यपूर्ण तंत्रज्ञानातून येतो. वाहन कंपन्या नव्या युगातील तंत्रज्ञानामध्ये गुंतवणूक वाढवत असून केपीआयटी यामध्ये आघाडीची कंपनी असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

देर आए दुरुस्त आए! अदानी शेअरचे छप्परफ़ाड रिटर्न, १ लाख रुपये गुंतवल्यावर मिळाला इतक्या कोटींचा परतावा
शेअरच्या किंमतीचा अंदाज काय?
बऱ्याच कंपन्या करोनाच्या प्रभावातून अद्यापही सावरलेल्या नाहीत आणि बँकिंग क्षेत्रातील संकटामुळे परिस्थिती आणखीनच बिकट झाली आहे. यामुळे कंपन्या तंत्रज्ञानावरील खर्च कमी करत किंवा टेक बजेटला विलंब करत आहेत. असे असूनही, KPIT कंपनीच्या कोणत्याही मोठ्या क्लायंटने ऑर्डर सोडली नाही. सेंद्रिय आणि अजैविक मार्गांद्वारे सॉफ्टवेअर डिझाइन केलेल्या वाहन कार्यक्रमाचा लाभ घेण्यासाठी कंपनी चांगल्या स्थितीत आहे. यामुळे कंपनीचा शेअर अल्पावधीत ९२३ रुपयांपर्यंत वाढण्याचा अंदाज आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here