ठाणे: पश्चिमेकडील रेती बंदरच्या पुलावरून तेथील खाडीत कंटेनर कोसळल्याची घटना घडली आहे. अपघाताची माहिती मिळताच कळवा पोलीस, अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून एका बोटीच्या मदतीनं बचावकार्य सुरू आहे. (Container topple down in Retibunder creek at Thane)

खारेगाव टोलनाक्यापासून काही अंतरावर सकाळी पावणे सहाच्या सुमारास हा अपघात झाला. अपघातग्रस्त कंटेनरचा क्र. MH 04 HY 8691 असा असून हा कंटनेर राजेंद्र घोरपडे यांच्या मालकीचा आहे. रमेश पांडे (वय ५५) नावाचा चालक हा कंटेनर घेऊन भिवंडीहून न्वाहा शेवाकडे निघाला होता. रेतीबंदर पुलाचा संरक्षक कठडा तोडून हा कंटेनर खाडीत कोसळला. गाडीचा चालक पांडे याला वाचवण्यात यश आलं असून त्याला माजिवडा येथील परम रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. अपघाताचं नेमकं कारण कळू शकलेलं नाही.

आणखी बातम्या:

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here