शिंदे फडणवीस सरकार बहुमताच्या जोरावर स्थापन झालेलं आहे. एखाद्या पक्षात फूट पडल्या नंतर दोन तृतियांश बहुमत, १२ खासदार, ४० आमदार असे ७५ टक्के संख्याबळ पाहून निवडणूक आयोगानं निकाल दिला असल्याचं रामदास आठवले म्हणाले. सुप्रीम कोर्ट अभ्यासपूर्ण निर्णय देईल. व्हीप हा हाऊस मध्ये असतो विधानपरिषद, राज्यसभा निवडणुकीत शिंदे यांनी पाळला आहे. मिटिंग साठी बोलावणे म्हणजे व्हीप नाही, असंही आठवले म्हणाले. शिंदे फडणवीस यांचे काम चांगले असून अडीच वर्षात जे निर्णय झाले नाही ते आता काही महिन्यात झाले आहेत, असं आठवले म्हणाले.
संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव पंतप्रधान पदासाठी जाहीर केलं आहे. मात्र, लोकसभेला भाजप आणि एनडीएला ३५० जागा मिळतील, असं रामदास आठवले म्हणाले. नरेंद्र मोदी यांच्या सरकारनं देशाला पाहिजे तसं बजेट मांडल आहे. राज्यात येणाऱ्या महापालिका आम्ही निवडणुकीत एकत्र असणार आहोत. नाशिक महानगरपालिकेसाठी भाजपकडे आम्ही 22 जागांची मागणी करतोय, असं रामदास आठवले म्हणाले. महापालिकांच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये होतील, अशी अपेक्षा आहे. दरम्यान रिपाईला एक मंत्रिपद मिळावं, एक विधानपरिषद आणि एका महामंडळावर संधी मिळाली पाहिजे, असं आठवले यांनी सांगितलं.
28 मे ला रिपाइंचे राष्ट्रीय अधिवेशन शिर्डी इथं आयोजित करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत. आमच्या पक्षाला नागालँड मध्ये स्वबळावर लढून 8 पैकी 2 जागा मिळाल्या आहेत. लोकसभेत 3 जागा द्याव्यात अशी मागणी केली आहे. शिर्डी मधून निवडणूक लढवण्याची इच्छा असून त्यासाठी अमित शहा, फडणवीस, शिंदे, यांच्याशी चर्चा करत असून ते तिथं मला तिथं मदत करतील, असं रामदास आठवले म्हणाले. मुंबईत सुद्धा आम्हाला एखादी जागा दिली पाहिजे, केंद्रात संधी मिळाली पाहिजे असं आठवले म्हणाले. माझा पक्ष मजबूत असून पुढच्या वेळी 5 आमदार असतील असे प्रयत्न सुरु असल्याचं आठवले म्हणाले.
निवडणुकीत सांभाळून घ्यावं लागेल, आम्ही एकत्र बसून निर्णय घेऊ, सेनेची नाराजी असली तर दूर करू, असं रामदास आठवले म्हणाले. केंद्रात कॅबिनेट मिळाले तर राज्यात भाजपला फायदा होईल, असं आठवले म्हणाले. जुनी पेन्शन योजनेची मागणी योग्य आहे. सरकारने त्याचा विचार करावा पणआर्थिक बळ पाहणे महत्त्वाचे आहे. पेन्शन लागू करावी त्यासाठी पाठिंबा असून आंदोलन थांबवले पाहिजे, असं रामदास आठवले म्हणाले.