amravati marriage, पुण्याचा ट्रेंड विदर्भात,नवदाम्पत्याचा करारनामा, पाहुण्यांच्या साक्षीनं मान्यता, अनोख्या लग्नाची चर्चा – amravati marriage news piyush and kasturi wedding bond hall take attention in partawada
अमरावती : लग्न म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण असतो. हा क्षण संस्मरणीय करण्यासाठी युवक युती सध्या भन्नाट कल्पना वापरत आहेत. पुण्याच्या एका नव दाम्पत्यानं काही दिवसांपूर्वी लग्नात करारनामा केला होता. त्यांच्या त्या कृतीची जोरदार चर्चा झाली होती. लग्नात नवदाम्पत्यानं करारनामा करण्याचा ट्रेंड आता विदर्भात पोहोचला आहे. अमरावतीच्या परतवाडा येथील नवदाम्पत्यानं देखील करारनामा केला आहे. अमरावती जिल्ह्यात विवाहप्रसंगी लग्नमंडपात वधू आणि वराने लग्नाच्या करारनाम्यावर स्वाक्षरी करून नात्यातला गोडवा जपण्याची हमी पाहुणे मंडळींना दिली. लग्नाना उपस्थित असलेल्या पाहुणे मंडळींमध्ये या लग्नातील वेगळेपणा चर्चेत राहिला.
मी शॉपिंगसाठी हट्ट धरणार नाही. वराचे मित्र घरी आल्यानंतर त्यांच्यासाठी स्वतःच्या हाताने जेवण बनवेल, अशा अटी वधूने करारनाम्यात मान्य केल्या. दुसरीकडे वधूचे म्हणणे नेहमी बरोबरच असेल.आमच्यात वादविवाद झाले तरी आमचे आम्हीच ते एक दिवसात मिटवू, अशी ग्वाही करारनाम्यात या दाम्पत्यानं दिली आहे.
माझं स्वप्न पूर्ण झालं; महाराष्ट्राची क्रश असलेली सायली पाटील चाहती म्हणून आकाशच्या प्रेमात
अचलपूरचे दीपक रामभाऊ काशीकर यांची कन्या कस्तुरी आणि अमरावती येथील रहिवासी नारायणराव शंकरराव बाराहाते यांचा मुलगा पियुष यांचा विवाह परतवाडा-अमरावती मार्गावरील एका मंगल कार्यालयात झाला. या विवाह सोहळ्यात लग्न सोहळ्याच्या ठिकाणी हा करारनामा दर्शनी भागात बघायला मिळाल्याने चांगलीच चर्चा रंगली होती.
शहराच्या इतिहासात लग्नातील हा पहिलाच करारनामा ठरला आहे. हा करारनामा दोन्ही पक्षाकडील पाहुणे मंडळींकरिता लक्षवेधी ठरला. या करारावर पियुष आणि कस्तुरी या दोघांनीही पाहुणे मंडळींच्या साक्षीने स्वाक्षऱ्या केल्या. साक्षीदारही याप्रसंगी हजर झाले आणि नात्यातील गोडवा जपण्याचा हा प्रयत्न चर्चेत आला. या लग्नाची आणि यांच्या आगळ्यावेगळ्या करारनाम्याची चर्चा सध्या जिल्हाभरात जोरदार सुरू आहे.
सध्या लग्नांचा हंगाम सुरु झाला आहे. लग्नाच्या या हंगामात अनेकजण वेगवेगळे प्रयोग करत असतात. लग्नातील करारनाम्याची सुरुवात पुण्यातील आंबेगाव तालुक्यातील एका दामप्यानं केली होती. आता त्याचं लोण विदर्भात देखील पोहोचलं आहे.