मुंबई: आईच्या मृतदेहचे तुकडे करणाऱ्या मुलीला पोलिसांनी अटक केली आहे. २३ वर्षांच्या रिंपल जैननं तिच्या ५५ वर्षीय आई वीणाची ३ महिन्यांपूर्वी हत्या केली. मृतदेहाचे तुकडे करून तिनं ते घरातील कपाटात, पाण्याच्या टाकीत लपवले. मृतदेहाचे लहान तुकडे बाथरुममधील ड्रेनमधून फ्लश करण्याचा प्रयत्न तिनं करून पाहिला. वीणा यांच्या मृत्यूची माहिती समोर येताच सगळ्यांनाच धक्का बसला. रिंपल असं काहीतरी करेल याची कल्पनादेखील कोणी केली नव्हती.

लालबागच्या इब्राहिम कासीम चाळीत वीणा आणि रिंपल वास्तव्यास होत्या. याच घरात पोलिसांना वीणा यांच्या मृतदेहाचे तुकडे सापडले. काळाचौकी पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत. रिंपल टीव्हीवर सातत्यानं क्राईम पेट्रोल पाहायची. दररोज क्राईम पेट्रोलचे एपिसोड पाहत असल्यानं तिला आईच्या मृतदेहाचे तुकडे करण्याचं सुचलं, अशी तपास अधिकाऱ्यांनी सांगितलं.
आईला संपवून ३ महिने उलटले, मामा बर्थडेसाठी घरी पोहोचले, पण…; पण, हत्येबद्दल वेगळाच संशय
शौचालयात जात असताना आई पहिल्या मजल्यावरून कोसळली. त्यानंतर आईची प्रकृती बिघडली. आईचा मृत्यू नैसर्गिकरित्या झाल्या. मी तिचा खून केला नाही, असं रिंपलनं पोलिसांना सांगितलं. आईच्या मृतदेहाचे तुकडे का केले, असा प्रश्न तिला विचारण्यात आला. त्यावर आईच्या मृत्यूला मलाच जबाबदार धरण्यात येईल, अशी भीती मला वाटत होती. त्यामुळे तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला, असं उत्तर रिंपलनं दिलं. वीणा यांचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, तो नैसर्गिक होता की रिंपलनं त्यांची हत्या केली, या प्रश्नांची उत्तरं पोलीस शोधत होतो. त्यासाठी शवविच्छेदन अहवालाची प्रतीक्षा आहे.
तू ड्रेन सक्शन कप आण! आईला संपवणाऱ्या लेकीची प्रियकराला सूचना; ३ महिन्यांपूर्वी काय घडलं?
या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत सहा जणांची चौकशी केली. वीणा यांचा मृत्यू २७ डिसेंबरला झाला असावा असं त्यांच्या जबाबांमधून समोर आलं आहे. २६ डिसेंबरला वीणा शौचालयात जात असताना पहिल्या मजल्यावरून कोसळल्या. त्यावेळी तिथे असलेल्या हॉटेल कर्मचाऱ्यांनी वीणा यांना घरी नेऊन सोडलं, अशी माहिती काळाचौकी पोलीस ठाणाच्या अधिकाऱ्यांनी दिली. याच दिवशी (२७ डिसेंबर) रिंपलनं रुम फ्रेशनर्स आणि फिनायल विकत घेतलं, असंही पोलिसांनी सांगितलं.
आईला संपवलं, परफ्युमच्या २०० बाटल्या; मुलगी एकटीच खिडकीत बसून असायची, ३ महिने लोटले अन्…
मी माझ्या आईला मारलं नाही. खाली पडल्यानं ती खूप जखमी झाली. त्यामुळेच ती दगावली, असं रिंपलनं पोलिसांना सांगितलं. एका साक्षीदारानं त्याच्या जबाबात हीच माहिती दिली आहे. रिंपलच्या संपर्कात असलेल्या आणि चाळीजवळ सँडविच स्टॉल चालवणाऱ्या बॉबीला पोलिसांनी उत्तर प्रदेशातून ताब्यात घेतलं. पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवला. मात्र त्यात काहीच संशयास्पद आढळून आलं नाही. त्यामुळे पोलिसांनी चौकशी करून त्याला सोडून दिलं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here