बलात्काराचा आरोप असलेला आपला अशील नपुंसक असल्याचा दावा आरोपीचे वकील एफ एन सोनीवाला यांनी न्यायालयासमोर केला होता. पोलिस तपासाचा एक भाग म्हणून वैद्यकीय परीक्षकांनी त्याचे वीर्य गोळा करण्यासाठी वेगवेगळ्या प्रसंगी तीन वेळा प्रयत्न केले होते, परंतु वैद्यकीय अहवालात ताठरता (इरेक्शन) अथवा स्खलन (इजॅक्युलेशन) नसल्याचे समोर आल्याकडे वकिलांनी लक्ष वेधले.
तक्रारदार मॉडेल ही प्रशांत धनक यांच्याकडून पैशांची मागणी करत होती, परंतु तिचे समाधान न झाल्याने तिच्याकडून एफआयआर दाखल करण्यात आला, असेही वकिलांनी पुढे सांगितले.
“दहा मिनिटांसाठी व्हायब्रेटर लावले गेले आणि त्यानंतर तिसऱ्यांदा तपासणीसाठी डॉपलर अल्ट्रासाऊंड देखील वापरण्यात आले, परंतु कोणताही परिणाम झाला नाही. तपास अधिकाऱ्यांनी सर्व पुरावे गोळा केले पण धनक यांचे वीर्य गोळा करता आले नाही. केवळ याच कारणामुळे ते अजूनही अविवाहित आहेत” असेही धनकच्या वकिलांनी पुढे सांगितले.
त्यांच्याच पक्षातील माणसांचं काम; शीतल म्हात्रेच्या व्हायरल विडिओवर रुपाली पाटलांची संतप्त प्रतिक्रिया
धनक यांना न्यायमूर्ती समीर दवे यांनी दहा हजार रुपयांचा वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. प्रमाणपत्र विचारात घेऊन न्यायाधीश म्हणाले की “अर्जदाराविरुद्ध चुकीच्या हेतूने एफआयआर दाखल करण्यात आला आहे असे प्राथमिकदृष्टया न्यायालयाचे मत आहे”