याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, विरेन जाधव हा चिखली परिसरात रिव्हर नावाच्या रेसिडेन्सीमध्ये राहत होता. विरेन हा टाटा मोटर्स या कंपनीत इंजिनियर (अभियंता) म्हणून काम करत होता. तो त्याच्या आईसोबत रहात असल्याची माहिती समोर आली आहे.
पोलिसांना चौकशी दरम्यान विरेनची नोटबुक मिळाली असून त्या डायरीत त्याने आत्महत्या करण्याचे कारण लिहिले आहे. मला चांगल्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी आहे, तरी मला आनंद मिळत नाही. असे त्याने नोटबुकमध्ये नोंद करून ठेवले आहे. या कारणामुळेच आपण आत्महत्या करत असल्याचे त्याने सांगितले आहे. त्यामुळे त्याने रहात असलेल्या घराच्या ११ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली आहे.
रिलसाठी कारमधून नोटा फेकल्या; यूट्यूबरला पोलिसांनी केली अटक
या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. विरेन हा मानसिक दृष्ट्या कमजोर असावा आणि त्यातूनच त्याने हे पाऊल उचलले असावे असा प्राथमिक अंदाज पोलिसांकडून व्यक्त करण्यात आला आहे. पोलिसांनी आकस्मित मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास करण्याचे काम सुरू आहे.