ठाणे : ऑनलाईन जुगार खेळून कर्जबाजारी झालेला कॅब ड्रायव्हर हा सोनसाखळी चोरटा निघाल्याची धक्कादायक घटना ठाणे पोलिसांनी उघडकीस आणली आहे. या चोरट्याला पकडण्यासाठी पोलिसांनी तब्बल ११० सीसीटीव्ही कॅमेरे तपासले आणि कसोशीने तपास करून चोरट्याला अटक केली आहे. त्याच्याकडून पोलिसांनी ६ गुन्ह्यांची उकल केली असून त्याच्या विरोधात ५ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहे. या चोरट्याकडून पोलिसांनी तब्बल २ लाख ५१ हजार १४८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

ठाण्यातील मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ फेब्रुवारी ते ११ मार्च या १० ते १२ दिवसांच्या कालावधीत ४ ते ५ सोनसाखळीचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. यातच दिवा परिसरात राहणाऱ्या एका वयोवृद्ध महिलेने देखील आपल्या गळ्यातील सोनसाखळी एका अज्ञात चोरट्याने हिसकावून पळ काढल्याची तक्रार नोंदवली. सोनसाखळी चोरीच्या घटनांमध्ये झपाट्याने वाढ होत असल्याचे निदर्शनात येताच मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एन बी कोल्हटकर यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली दोन पथके तयार केली. या पथकाने दिवा, मुंब्रा, खर्डीगाव, शिळफाटा अशा आसपासचे परिसरात गुन्हेगारी करण्याची पद्धत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहन तसेच तांत्रिक यंत्रणा आणि गोपनीय बातमीदाराच्या मदतीने शोध सुरु केला.

मुंब्रा पोलीस ठाण्यात १० ते १२ दिवसात अशा प्रकारच्या घटनांमध्ये वाढ झाली असून त्यावर आळा घालण्यासाठी पोलिसांनी आसपासच्या दिवा, मुंब्रा, खर्डीगाव, शिळफाटा परिसरातील ११० सीसीटीव्ही कॅमेरे तपासून गुन्हेगारी करण्याची पद्धत, गुन्हे करण्यासाठी वापरलेले वाहनाच्या मदतीने अज्ञात संशयित चोरट्याची ओळख पटवली आणि संशयित आरोपीची ओळख पटवली.

राज्यातील पहिली तृतीयपंथीयांची पोलीस भरती साताऱ्यात; ३ जणांसाठी अख्खी पोलीस यंत्रणा कामाला

संशयित आरोपी निर्मलनगर खर्डी येथे पोलिसांच्या निदर्शनात आल्यानंतर त्याने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. कमलेश रामानंद गुप्ता असे ३३ वर्षीय आरोपीचे नाव असून त्याची कसून चौकशी केली असता त्याच्याकडून पोलिसांनी ६ गुन्ह्यांची उकल केली असून त्याच्या विरोधात ५ पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असल्याचे निष्पन्न झाले.

रिक्षा बंद पडली, मंदिराजवळ सहकाऱ्यासोबत डबा खाल्ला, रात्रीच्या अंधारात महिलेचं लैंगिक शोषण
मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ४ विष्णूनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ आणि नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत १ असे सोनसाखळी चोरी आणि जबरी चोरीचे गुन्हे पोलिसांनी उघडकीस आणले आहेत. तसेच मुंब्रा, कोपरखैरणे, रबाळे, नालासोपारा आणि वापी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे दाखल आहेत. या संपूर्ण प्रकरणी पोलिसांनी त्याच्याकडून १ लाख ९१ हजार १४८ रुपये किमतीचे ६१ ग्राम सोन्याचे दागिने व नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी केलेले ६० हजार रुपये किमतीची मोटारसायकल असा एकूण २ लाख ५१ हजार १४८ रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

पत्नी-मुलाचा खून करुन आयटी इंजिनिअरने स्वतःला संपवलं, पुण्यातील हत्याकांडाचं गूढ उकललं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here