नवी दिल्ली : देशाच्या राजधानीत दिल्ली पोलीस कर्मचार्‍यांनी लज्जास्पद कृत्य केल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली आहे. पूर्व दिल्लीतील शाहदरा येथे तीन दिल्ली पोलिस कर्मचार्‍यांसह सात जणांनी दोन मांस विक्रेत्यांना मारहाण करून लुटले. ही घटना ७ मार्च रोजी आनंद विहार परिसरात घडली. हे दोघे मांस विक्रेते दोघेही त्यांच्या कारमधून जात होते आणि त्यांची कार एका स्कूटीला धडकली. त्यानंतर पुढची धक्कादायक घटना घडली.

तीन पोलीस निलंबित

या घटनेबाबत पोलिसांनी दिलेली माहिती धक्कादायक आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, काही ‘गोरक्षकांच्या’ संगनमताने पोलिसांनी या दोन मांस विक्रेत्यांच्या चेहऱ्यावर लघवी केली आणि नंतर त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी चार दिवसांनी गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, पीडित मांस विक्रेत्यांनी तत्काळ पोलिसांशी संपर्क साधला. या घटनेत सहभागी असलेल्या सातही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून एका सहायक उपनिरीक्षकासह तीन पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

खूपच महाग विकले जातात उंटाचे अश्रू, अनेक देशांत संशोधन, फायदे पाहून म्हणाल हा चमत्कारच
कार स्कूटीला धडकली

या प्रकरणी दाखल झालेल्या एफआयआरनुसार, गाझीपूर कत्तलखान्यातील मांस विक्रेता नवाब, त्याचा चुलत भाऊ शोएबसोबत त्याच्या कारमध्ये मांस घेऊन मुस्तफाबाद येथील त्यांच्या घरी जात होते. मात्र प्रवासात आनंद विहारजवळ त्यांच्या कारने एका स्कूटीला धडक दिली. स्कूटीस्वाराने त्याच्याकडे चार हजार रुपयांची भरपाई मागितली. त्यानंतर एक पीसीआर व्हॅन तेथे पोहोचली आणि एका पोलीस कर्मचाऱ्याने मांस विक्रेत्यांकडून दोन हजार पाचशे रुपये घेऊन स्कूटी चालकाला दिले.

चेहऱ्यावर केली लघवी

पोलिस कर्मचाऱ्याने मांस विक्रेत्यांकडे १५ हजार रुपयांची मागणी केली आणि पैसे न दिल्यास त्यांना पोलिस ठाण्यात नेण्याची धमकी दिली, असे एफआयआरमध्ये नमूद करण्यात आले आहे. पीसीआर व्हॅनमधील पोलिसांनी आणखी चार जणांना बोलावून त्यांना एका निर्जनस्थळी नेले, असा आरोप या तक्रारदार मांस विक्रेत्यांनी केला आहे. आरोपींनी नवाब आणि त्याच्या चुलत भावाला बांधून ठेवले आणि मारहाण केली आणि चाकूने त्याचे हात कापण्याचा प्रयत्न केला. एवढेच नाही तर आरोपीने त्याच्या चेहऱ्यावर लघवी करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला आणि धमकी दिली असे नवाब याचे म्हणणे आहे.

महिलांनी समाजाचे नेतृत्व करावे; स्त्री-पुरुष समानतेवर भर देत राष्ट्रपती मुर्मू यांचे महत्त्वाचे विधान
पोलिसांनी गोहत्येचा आरोप केल्याचा आरोप

पोलिसांनी नवाबवर गोहत्येचा आरोप केला आणि त्याला ठार मारल्यानंतर त्याचा मृतदेह नाल्यात फेकण्याची धमकी दिली, असे नवाबचे म्हणणे आहे. एफआयआरमध्ये पुढे म्हटले आहे की पोलिसांनी पीडितांकडून २५,५०० रुपये उकळले. त्यांना काही अंमली पदार्थाचे इंजेक्‍शन देण्यात आले आणि पोलिसांकडून काही कोऱ्या कागदांवर सह्या करून घेतला असा गंभीर आरोपही या तक्रारदार मांसपुरवठादारांनी केला आहे.

पुणेकरांची चिंता वाढली, H3N2 चे २२ रुग्ण आढळले, ५ वर्षांखालील मुलांसाठी ठरतोय धोकादायक
गुन्हा दाखल झाल्यानंतर दोषींवर कारवाई

पीडितांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाली असून त्यांना जीटीबी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणी १० मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला, असे पोलिसांनी सांगितले.तक्रारदारांनी केलेल्या आरोपांची पडताळणी आम्ही करत आहेत,असे पोलिसांनी सांगितले. मात्र, प्राथमिक तपासानुसार एका एएसआयसह तीन पोलिसांवर विभागीय कारवाई सुरू करण्यात आली असून, चौकशी होईपर्यंत त्यांना निलंबित करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here