गांधीनगर : गुजरात जिल्ह्यात वलसाड तालुक्यातील जुजवा गावचे रहिवासी असलेल्या कंवलजीत यांनी राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्येपूर्वी व्हिडिओ शेअर करत त्यांनी आपल्या पत्नीच्या जाचाला कंटाळून जीव देत असल्याचा आरोप केला. कंवलजीत हे कोटक महिंद्रा बँकेत मॅनेजर पदावर कार्यरत होते. त्यांना आत्महत्या करत असताना धाकट्या मुलाने पाहिलं आणि आपल्या दादाला सांगितलं, मात्र चार वर्षांचा चिमुकला गंमत करत असावा, या समजातून मोठ्या भावाने त्याकडे दुर्लक्ष केलं. परंतु नंतर कंवलजीत यांच्या वहिनीने त्यांना गळफास घेतलेल्या अवस्थेत पाहिलं आणि सगळ्या गोष्टींचा उलगडा झाला.

व्हिडिओ शूट करत आपबिती

“भूमिका ठाकूर माझी पत्नी आहे. तिचे सुनील वर्मासोबत गेल्या अडीच वर्षांपासून अफेअर आहे. मी त्यांना अनेकदा रंगेहाथ पकडले आहे. मी तिला अनेक संधी दिल्या, पण ती बधली नाही. चुकीच्या माणसासाठी तिने मला आणि माझ्या मुलांना सोडले. मी समजावून सांगायला गेलो असता, तुझ्याशी माझा काहीही संबंध नाही, कुठेतरी जाऊन जीव दे, असे तिने सांगितले. तर प्रिये मी माझा जीव सोडत आहे. मी हा व्हिडीओ बनवत आहे, कारण मी माझ्या पत्नीवर मनापासून प्रेम करतो, तिचे प्रेम नसले तरीही मी तिचा तिरस्कार करू शकत नाही. माझ्या मृत्यूला भूमिका ठाकूर जबाबदार आहे” हे शेवटचे शब्द होते कोटक महिंद्रा बँकेचे शाखा प्रमुख (व्यवस्थापक) कंवलजीत सिंग यांचे. ‘दिव्य भास्कर’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

मृत कंवलजितसिंग यांचा भाऊ अमरजितसिंग याने पोलिसांसमोर दिलेल्या तक्रारीत असेही म्हटले आहे की, भावाची पत्नी भूमिकाचे एका बिल्डरसोबत प्रेमसंबंध होते. या प्रकरणी पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला आहे, मात्र अद्याप आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.

कंवलजितसिंग यांचा भाऊ अमरजितसिंग याने सांगितले की, १८ डिसेंबरपासून आमचे आई-वडील राजस्थानमध्ये एका लग्नासाठी गेले होते. आत्महत्येच्या आदल्या दिवशी म्हणजे २२ फेब्रुवारीला माझा भाऊ कामावर गेला नाही, २३ फेब्रुवारीलाही तो कामावर गेला नाही. मी माझ्या भावाला १२.५३ वाजता कामावरून फोन केला, तर तो म्हणाला ‘मला काम करायला आवडत नाही’ मी माझ्या भावाला सांगितले की ‘तुला काम करायचे नसेल तर २७ जानेवारीला कोटक महिंद्रा बँकेच्या शाखेत का रुजू झालास?’ यावर ‘तुम्ही लवकर या, आपण बोलूया’ असे म्हणत त्याने फोन ठेवला.

दोनदा वाचले, पण तिसरी कारवाई फत्ते; पन्हाळ्याच्या पायथ्याशी सेक्स रॅकेट, तिघे जण ताब्यात
घटनेच्या दिवशी कंवलजित यांचा पत्नी भूमिकासोबत फोनवर जोरदार वाद झाला. या जोरदार भांडणानंतर, माझा भाऊ त्याच्या खोलीत वर गेला आणि पंख्याला स्कार्फ बांधून आत्महत्या केली. त्याचा ४ वर्षांचा मुलगा खेळण्यासाठी वरच्या मजल्यावर गेला, त्याने हे दृश्य पाहिले आणि खाली आला. तो त्याच्या १० वर्षांच्या भावाला म्हणाला की ‘बाबा पंखे साफ करत होते. त्यांनी हात हलवून लघवी केली’ पण माझ्या भावाच्या मोठ्या मुलाला हा विनोद वाटला म्हणून त्याने लक्ष दिले नाही, असेही अमरजितसिंग याने सांगितले.

माझ्या भोळ्याभाबड्या शेतकऱ्यांना विधानभवन दाखवलं, आनंदाचा क्षण; निलेश लंकेंची प्रतिक्रिया

माझी पत्नी ४ वाजता कपडे वाळत टाकायला गेली, तेव्हा तिला माझा मोठा भाऊ पंख्याला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसला. माझ्या पत्नीने मला फोन केला आणि मी घरी आलो. मी माझ्या भावाच्या व्हॉट्सअॅपवर पाहिले, तर त्याचे लास्ट सीन दुपारी ३.३५ वाजता होते’ असेही अमरजीतने सांगितले.

पदरात १५ दिवसांचं बाळ, २५ वर्षीय माऊलीने रुग्णालयाच्या बाथरुममध्येच स्वतःला संपवलं

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here