न्यूयॉर्क : अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर देखील अटकेची टांगती तलवार आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी एक सोशल मीडिया पोस्ट करुन यासंदर्भात माहिती दिली आहे. मंगळवारी अटक केली जाऊ शकते, असं ट्रम्प म्हणाले. त्यांनी त्यांच्या समर्थकांना या संदर्भात आवाहन केलं आहे. समर्थकांनी अटकेचा विरोध करावा, असं त्यांनी म्हटलं आहे. ट्रम्प यांनी त्यांना या संदर्भातील माहिती मॅनहट्टन जिल्ह्याच्या अटॉर्नीच्या कार्यालयातून मिळाल्याचं म्हटलं आहे. नेमक्या कोणत्या आरोपाखाली अटक केली जाणार आहे, याची माहिती नसल्याचं ट्रम्प म्हणाले. या प्रकरणी जिल्हा अटॉर्नी कार्यालयाच्या प्रवक्त्यानं काहीही भाष्य करण्यास नकार दिला आहे.

माजी अध्यक्ष ट्रम्प यांनी सांगितलं की, न्यूयॉर्कच्या काही महिलांना देण्यात आलेल्या पैशांच्या प्रकरणाचा तपास सुरु आहे. या प्रकरणी त्यांच्यावर अटकेची कारवाई होऊ शकते. ट्रम्प यांनी महिलांशी शारिरीक संबंध ठेवून बाहेर वाच्यता न करण्यासाठी पैसे दिल्याचा आरोप आहे.

मी फुकटचा वारसा घेऊन उभा राहिलो नाही; धनंजय मुडेंचा पंकजा मुडेंवर हल्लाबोल

ट्रम्प यांनी आज त्यांच्या सोशल मीडिया नेटवर्कवर एक पोस्ट लिहिली होती. मॅनहट्टनच्या जिल्हा अटॉर्नी कार्यालयातून अवैधरित्या लीक झालेल्या माहितीतून अटकेचे संकेत मिळाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. रिपब्लिकनचे नेते आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष असलेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी अटक होऊ शकते, असं म्हटलं.

मला चांगल्या पगाराची नोकरी, पण मन लागत नाही; पिंपरीत २७ वर्षीय अभियंत्याने आयुष्य संपवलं

डोनाल्ड ट्रम्प यांनी त्यांच्या समर्थकांना अटकेच्या कारवाई विरोधात आंदोलन करण्याचं आवाहन केलं आहे. न्यूयॉर्कचे कायदा अंमलबजावणी अधिकारी या प्रकरणी सुरक्षेचा आढावा घेत आहेत. डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर अभियोग देखील लावला जाऊ शकतो. मात्र, यासंदर्भात अधिक माहिती किंवा तपशील सार्वजनिक झालेला नाही.

काय आहे प्रकरण?

हे प्रकरण पोर्न स्टार डेनियलशी संबंधित असून त्यांचं खरं नाव स्टेफनी क्लिफोर्ड आहे. दहा वर्षांपूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी अफेअर असल्याचं म्हटलं होतं. मात्र, ट्रम्प यांनी ते त्याचा इन्कार केला होता. डोनाल्ड ट्रम्प २०१७ ते २०२१ मध्ये अमेरिकेचे अध्यक्ष होते.

आभाळ फाटलं! मराठवाडा, नगर-नाशिकमध्ये गारांचा मारा; पिकं उद्ध्वस्त, शेतकऱ्यांच्या डोळ्यांत अश्रू

दरम्यान, येत्या मंगळवारी डोनाल्ड ट्रम्प यांना खरंच अटक होणार का हे पाहावं लागणार आहे.

रोहित शर्मासाठी दुसरा वनडे सामना ठरणार लकी, जाणून घ्या महत्वाचं कारण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here