मुंबई: मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष यांना तडीपारीची नोटीस आल्यानंतर ठाण्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. शिवसेना व या दोन्ही पक्षांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. खुद्द मनसे अध्यक्ष यांनी जाधव यांना आलेल्या नोटिशीची दखल घेतली असून त्यांना खास निरोप पाठवला आहे.

वसई-विरार महापालिकेत आंदोलन केल्याप्रकरणी जाधव यांना तडीपारीची नोटीस बजावण्यात आली आहे. विरारच्या उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालानं जाधव यांना ४ ऑगस्ट रोजी चौकशीसाठी हजर राहण्यास सांगितलं आहे. ठाणे महापालिका मुख्यालयासमोर परिचारिकांसाठी आंदोलन करत असताना जाधव यांना ही नोटीस मिळाली. लोकांच्या हितासाठी आंदोलन करत असल्यामुळं राज्य सरकारनं बक्षीस दिल्याचं जाधव यांनी म्हटलं होतं. तसंच, जाधव यांना आलेल्या नोटिशीवरून शिवसेना व मनसेत खडाजंगी सुरू होती.

वाचा:

या सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी नुकतीच पक्षाचे नेते यांच्याशी चर्चा केली. राज ठाकरेंच्या सूचनेनुसार, नांदगावकर यांनी ठाण्यातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा देखील केली. तसंच, अविनाश जाधव यांना निरोपही पाठवला. ‘अविनाश, मै हू ना’ अशा शब्दांत राज यांनी जाधव यांना धीर दिला.

नांदगावकर यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून याबाबत माहिती दिली आहे. ‘राजकारणात विविध पक्ष असतात, पण मनसे हा परिवार आहे. परिवारात कोणी अडचणीत असल्यास सर्व परिवारच ठामपणे त्याच्या मागे आपली पूर्ण ताकद उभी करतो. आमचे कुटुंबप्रमुख राजसाहेब हे सर्व कार्यकर्त्यांवर जीवापाड प्रेम करतात व त्यांना जपतात. अविनाशबद्दलची त्यांची तळमळ मी स्वत: तीव्रतेने अनुभवली. तिथून निघताना साहेबांनी एकच निरोप अविनाशला दयायला सांगितला, ‘अविनाश, मै हू ना!’ यात सगळेच आले,’ असं नांदगावकर यांनी म्हटलं आहे. ‘राज ठाकरे यांच्या शब्दांनी कार्यकर्त्यांमध्ये १०० हत्तींचे बळ येते. अशा पद्धतीने राजकारण करून तुम्ही आमच्यातील हाडाच्या कार्यकर्त्यांना घाबरवू शकत नाही हे लक्षात ठेवा. जनतेसाठी आमचा लढा हा असाच अविरतपणे कायम राहील,’ असा इशाराही नांदगावकर यांनी दिला आहे.

Maharashtra News, Latest Maharashtra News in Marathi, ‎महाराष्ट्र ठळक बातम्या | Maharashtra Times

5 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here