स्पेनमध्ये गेल्या ३६ महिन्यांपासून पावसाची तीव्रता कमी झालीये त्यामुळं काही प्रमाणात देशात दुष्काळग्रस्त स्थिती आहे. पाऊस कमी झाल्याने नदी, तलाव, जलाशय सारख्या जलस्त्रोतील पाण्याने तळ गाठायला सुरुवात केली आहे. स्पेनमधील सॅम रोमन डे साउ गावातील साउ जलाशयाचे पाणी वेगाने आटत आहे. १९९०नंतर पहिल्यांदा पाण्याने तळ गाठला आहे. त्यामुळं जलाशयात बुडालेलं चर्च आता बाहेर आलं आहे.

साउ गाव स्पेनमधील कॅटालोनिया प्रांतात आहे. इथे गेल्या चार दशकातील सर्वात भयानक दुष्काळ पडला आहे. येत्या काही दिवसांत परिस्थिती अजून बिघडू शकते, असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. पाण्याची कमतरता जाणवू लागल्याने नागरिकांनी पाणी जपून वापरावे, असं आवाहन प्रशासनाने केले आहे.

प्रवाशांना मोठा दिलासा; एसटीचा प्रवास आता होणार आरामदायी, हिरकणी, रातराणी पुन्हा धावणार
बार्सिलोना आणि माद्रिदच्या आसपासचे भागही दुष्काळाचे बळी ठरले आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी तलावांचे तळ दिसू लागले आहेत. स्पेनच्या हवामान विभागाने एईएमईटी यांनी दिलेल्यामाहितीनुसार, दुष्काळ पडल्यामुळं जंगलात आग लागण्याचे प्रमाण वाढू शकते. उष्णतेच्या लाटेचीही शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण, उत्तर-पूर्वी भूमध्यसागरच्या जवळपास असलेल्या परिसरात उष्णता वाढत चालली आहे. ज्यामुळं कॅटालोनिया, बार्सिलोना आणि माद्रिद या शहरांवरही परिणाम होत आहे.

‘सेक्सटॉर्शन’मधून उकळले लाखो रुपये; परळ, घाटकोपरमधील दोघांची फसवणूक
साउ जलाशयात फक्त १० टक्के पाणी उरले आहे. त्यामुळं लोकं आता साउ जलाशयातून वेगाने मासे काढत आहेत. कारण ऑक्सिजनच्या कमतरतेमुळं माश्यांचा मृत्यू होऊ शकतो. त्यामुळं माशांना बाहेर काढणे योग्य आहे, असं इथले नागरिक म्हणतात. मासे काढल्याने जलाशयातील पाणी स्वच्छ व पिण्यायोग्य होईल.

रोजंदारीची मात्रा; संपकाळात रुग्णांची गैरसोय टाळण्यासाठी सरकारचे पाऊल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here