घरातून सोन्याचा हंडा काढल्यानंतर दोघांनी पुन्हा महिलेकडून १३ हजार रुपये घेतले. त्यानंतर त्यांनी तुमच्या घरात यापेक्षाही एक मोठा हिरा आहे तो नंतर काढून देतो, असे म्हणत पैसे घेऊन दोघेही निघून गेले. दुसऱ्यादिवशी फोन करुन माझ्या मित्राला २१ हजार रुपये देऊन त्याच्याकडून औषध घेऊन या असे भामट्याने सांगितले. महिलेच्या मुलाने सकाळच्या सुमारास बसस्थानकावर जात २१ हजार रुपये देत औषध घेत घरी आणले. दोन्ही आरोपी पुन्हा घरी आले मुलाने औषध त्यांना दिले त्यांनी ते औषध हांडा काढला त्या खड्ड्यात टाकले आणि या खड्ड्यात मोठा हिरा आहे असे म्हणत तो खड्डा बुजवून १० हजार रुपये घेतले. १२ मार्च रोजी महिलेच्या मुलाने भामट्याला फोन केला असता हिरा काढण्यासाठी ९ लाख १० हजार रुपये द्यावे लागेल असे सांगितले. अखेर महिलेने पैसे देणं होत नसल्याचे सांगितले. महिलेला संशय आल्याने तिने हांडा उघडून पाहिला असता त्यान सोन्याचे पॉलिश केलेले दगडं आणि मूर्ती होती. अखेर महिलेला आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले.
gold found in wardha, महिलेच्या घरातून काढला सोन्याचा हंडा, पण आनंद क्षणभरच टिकला, सत्य ऐकून सगळेच हादरले – gold pot found in house but wardha police investigation revealed a shocking reality
वर्धाः तुमच्या घरात सोन्याचा हंडा आहे, तो काढण्यासाठी पैसे लागतील. सोन्याचा हिरा देखील आहे, असे आमिष महिलेला दाखवले. घरातून सोन्याचा हंडादेखील काढला. मात्र, काहीच वेळात महिलेला मोठा धक्का बसला. महिलेने सोन्याच्या हंड्याची पाहणी केली असता त्यातून सोन्याचे पॉलिश केलेले दगडं निघाले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच महिलेने परिसरातील नागरिकांच्या मदतीने दोन्ही भामट्यांना पकडून ठेवत पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली असून आसाराम नंदू वाघ, रोशन पिसाराम गुजर रा. परसोळी ता. कळमेश्वर जि. नागपूर यांचा समावेश असून दोन आरोपी फरार असल्याची माहिती आर्वी पोलिसांनी दिली.