असाच प्रकार एका चालकाने कार लपविण्यासाठी केला. आरटीओ पथकाला चकवा देण्यासाठी त्याने महाबळेश्वरच्या गल्लीबोळातून सुसाट कार पळवली. पण आरटीओच्या वाहतूक निरीक्षकांनी त्याचा पाठलाग करून अखेर त्याला ताब्यात घेतलं. याप्रकरणी कारचालक अजमुद्दीन वलगे याला १ लाख ९० हजार रुपयांचा दंड बजावण्यात आला आहे. तसेच वाहन चालवण्याचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द केला आहे. ही कारवाई प्रादेशिक परिवहन अधिकारी वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांनी केली.
इराणी पेट्रोल पंपाजवळ सकाळच्या सुमारास परिवहन विभागाचे (RTO) वाहन पाहताच कार चालकाने (एमएच ११ बीडी ८२८२) पोबारा करण्याचा प्रयत्न केला. ही बाब वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांच्या लक्षात आली. अधिकारी मुलानी यांना संशय आल्याने त्यांनी त्या कारचा पाठलाग केला. कारचालकाने शहराच्या गल्लीबोळातून कार भरधाव पळवण्याचा प्रयत्न केला. यावेळी भरधाव कारने एका दुचाकीला धडक दिली. या धडकेमध्ये कारचा पुढील टायर पंक्चर झाल्याने वेग कमी झाला आणि पाठीमागून आलेल्या वाहतूक निरीक्षक आफरीन मुलाणी यांनी चालकाला पकडलं. त्याच्याकडे अधिक चौकशी करून त्याला महाबळेश्वर आगारात नेलं. तेव्हा कारचा सहा वर्षे वाहन कर थकीत होता. यामुळे चालकाला कारसह ताब्यात घेतले. वाहन चालकाला तब्बल १ लाख ९० हजार रुपयांचे चलान दिले. तसेच कारचालकाचा परवाना सहा महिन्यांसाठी रद्द करून वाहन जप्त केलं.
तेलाचे डबे, साबुदाण्याची पोती; काजू-बदाम, साबण; लाखोंच्या मालावर डल्ला, चोरी करण्यासाठी थेट कार