अशुभ मुहूर्तामुळेच झाला करोना- दिग्विजय सिंह
माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांनी एका पाठोपाठ एक ट्विट करत भाष्य केले आहे. हिंदू धर्मातील मान्यतांना न मानल्यामुळेच असे झाल्याचे ते म्हणाले. अशुभ मुहूर्तावर भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्यानेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि राम मंदिराच्या पुजाऱ्याला करोनाची लागण झाल्याचे दिग्विजय म्हणाले.
हिंदू मान्यतांना बाजूला सारल्याचाच हा परिणाम- दिग्विजय सिंह
सनातन हिंदू धर्माच्या मान्यता डावलल्याचाच हा परिणाम असल्याचे दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे. या मुळे राम मंदिराच्या पुजाऱ्याला झाला, त्यात प्रमाणे उत्तर प्रदेशच्या मंत्री कमलाराणी वरुण यांचा करोनामुळे मृत्यू झाला. तर उत्तर प्रदेश भारतीय जनता पक्षाचे उत्तर अध्यक्षही करोनामुळे रुग्णालयात भरती आहेत, असे दिग्विजय सिंह यांनी लिहिले आहे.
गृहमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत करोना
देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. तसेच मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री आणि भाजप प्रदेशाध्यक्ष हे देखील रुग्णालयात करोनावर उपचार घेत आहेत. तसेच कर्नाटक भाजपचे मुख्यमंत्री एडियुरप्पा यांना देखील करोना झाला असून, तेही रुग्णालयात उपचार घेत आहेत, याकडे ट्विटच्या माध्यमातून दिग्विजय सिंह यांनी लक्ष वेधले आहे.
वाचा बातमी:
वाचा बातमी: राम मंदिर भूमिपूजनावर अनेक संतानी उपस्थित केले प्रश्न
अनेक साधूंसह काशीचे ज्योतिष्यांन देखील राम मंदिर भूमिपूजनाच्या मुहूर्तावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. हा मुहूर्त अशुभ असल्याचे शंकराचार्य स्वरुपानंद सरस्वती(Shankaracharya Swaroopanand Saraswati) यांनी देखील या पूर्वी म्हटले आहे. या पूर्वी त्यांचे शिष्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी देखील आपल्या फेसबुक पेजवर राम मंदिराच्या भूमिपूजनाची तिथी, अर्थात ५ ऑगस्ट हा दिवस अशुभ दिवस असल्याचे सांगितले आहे.
ही देखील बातमी वाचा:
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
bookmarked!!, I like your blog!
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
I really like and appreciate your blog post.
I like the valuable information you provide in your articles.
Like!! I blog frequently and I really thank you for your content. The article has truly peaked my interest.