संबंधित व्यक्तीने सांगितल्यानुसार तक्रारदाराने त्याचा फोन नंबर कस्टमर सपोर्टमध्ये नोंद केली. तसंच, अॅपवरुन डेबिट कार्ड स्कॅन केले तसंच, त्यानंतर पॉपअप झालेल्या लिंकवर क्लिक करताच एक वेबपेज ओपन झाले. तिथे त्याचे बँकेचा युजर आयडी व पासवर्ड आणि एटीएमचा पिन टाकला. तसं करताच त्याच्या खात्यातून ४० हजार रुपये काढण्यात आले. पैसै खात्यातून गेल्यानंतर तक्रारदाराने त्यासंबंधी जाब विचारला. मात्र, आरोपींनी पैसे काहीवेळातच रिफंड होतील तसंच, तिकिट कन्फर्मेशनदेखील मिळेल.
आरोपीने तक्रारदाराला वेळोवेळी ईमेल तपासत राहायलादेखील सांगितले होते. मात्र, या काळात एकदाही त्याला तिकिटासंबधित मेल आला नाही. त्यावेळी तक्रारदाराने या पूर्वी पाठवलेले ४० हजार रुपये परत मिळवण्यासाठी आरोपीकडे विचारणे केली. त्यावेळी आरोपीने पैसे परत मिळतीस असे पटवून देत अधिक पैशांची मागणी केली आणि तक्रारदाकही त्याच्या आमिषाला भुलला व त्याला पैसे पाठवत राहिला. आत्तापर्यंत तक्रारदाराने १.१५ लाख रुपये पाठवले मात्र, त्याला कोणत्याही प्रकारे परतावा मिळाला नाही, असं पोलिसांनी म्हटलं आहे.