PUne Crime news : पुण्यात शेतात (Opium Poppies)  गांजाची लागवड (Pune Crime) केल्याच्या बातम्या (Pune Crime News) आजपर्यंत आपण पाहिल्या आहेत. पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये अफुची शेती करणाऱ्या शेतकऱ्यावर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईत शेतकऱ्यांकडून 2 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. आंबेगाव तालुक्यामधील गंगापूर गावामध्ये घोडेगाव घोडेगाव पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही कार्यवाही करण्यात आली आहे. 

आंबेगाव तालुक्यात मोजे गंगापूर येथील शेतकरी श्रीसंत यांच्या शेतात 1 लाख 87 हजार रुपये किमतीचे अफुची शेती करत असल्याचं समजलं. अफुची शेती करण्यासाठी लागणारे, सर्व साहित्य, बी-बियाणेसुद्धा पोलिसांना यावेळी तपासात सापडले. तब्बल दोन लाख रुपयाचा अफूच्या शेतीचा माल जप्त करण्यात आलेला आहे. पोलिसांना या संदर्भात माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी तपासनी केली त्यात पोलिसांना अफुची शेती केल्याचं आढळून आलं. त्यानंतर त्यांनी लगेच कारवाई केली आणि मुद्देमाल जप्त केला. 

आठवडाभरातील दुसरी कारवाई 

पुण्यातील आंबेगाव तालुक्यातही अफुच्या शेतीवरील आतापर्यंतची दुसरी कारवाई आहे. लांडेवाडी, पिंगळवाडी येथील कांद्याच्या पिकामध्ये  शेतात अफूची लागवड केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली होती. या प्रकरणी शेतकऱ्याला अटक करण्यात आली होती. बन्सीलाल गेनभाऊ हुले (वय 73 वर्षे, रा. पिंगळवाडी) असे अटक केलेल्या शेतकऱ्याचं नाव होतं. आरोपी असलेल्या बन्सीलाल गेनभाऊ हुले यांनी लांडेवाडी, पिंगळवाडी येथील कांद्याच्या पिकामध्ये अफूच्या झाडांची लागवड केली होती. याप्रकरणी पोलिसांनीच तक्रार दाखल केली होती. हुले यांची पिंगळवाडी गावात चार गुंठे शेती आहे. याच शेतात अफूची लागवड केली आहे, अशी माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने या शेताची पाहणी केली. त्यावेळी शेतात अफूची लागवड केल्याचं समोर आलं. त्यानंतर पोलिसांनी हुले याला अटक केली आणि माल जप्त केला होता.

news reels reels

शेतकऱ्यांवर पोलिसांची करडी नजर

अफूची शेती करणं महाराष्ट्रात बेकायदेशीर आहे. तरीही अनेक शेतकरी अमली पदार्थांची शेती करताना दिसतात. पैशांसाठी शेतकऱ्यांचा हा खेळ सुरु असतो. मात्र याचा पोलिसांना सुगावा लागला की शेतकऱ्यांवर कारवाई होते. अफूच नाही तर गांजाची लागवड केल्याचे प्रकार देखील अनेकदा समोर आले आहे. आतापर्यंत महाराष्ट्रातील विविध परिसरातील शेतकऱ्यांवर अफूची किंवा इतर अमली पदार्थाची लागवड केल्याने कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या विशेष पथकाकडून अशा शेतकऱ्यांवर नजर देखील ठेवण्यात येते. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Pune Accident News : पुण्यात चांदणी चौकातात भीषण अपघात; बस थेट 15 फूट खाली कोसळली अन्…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here