मुंबई : लालबाग हत्याकांडामध्ये आता आरोपी रिंपलने पोलिसांना आणखी धक्कादायक माहिती दिली आहे. अखेर तिने आईची हत्या का केली? याचा खुलासा तिने पोलिसांसमोर केला आहे. आपल्या जन्मदात्या आईची हत्या करून तिच्या मृतदेहाचे ५ तुकडे करणाऱ्या रिंपल जैनने मुंबई पोलिसांच्या चौकशीत मोठा खुलासा केला आहे. काहीही कारण नसताना आई वारंवार टोकायची. यामुळे ती अस्वस्थ झाली होती. अशात दुसरीकडे, तिच्या आईचा शिड्यांवरून खाली पडून मृत्यू झाला. तेव्हा आरोपाच्या भीतीने तिने आईच्या मृतदेहाचे ५ तुकडे केले, असं तिने पोलिसांना सांगितलं आहे.

दरम्यान, इमारतीतील एका रेस्टॉरंटमधील कर्मचार्‍यांपैकी एक, ज्याने रिंपल जैनला तिची आई वीणा कथितपणे पडल्यानंतर तिला त्यांच्या घरी घेऊन जाण्यास मदत केली होती. त्याने पोलिसांना या प्रकरणी धक्कादायक माहिती दिली. त्याने सांगितले की, त्यांनी तिला “आंटी (वीणा) श्वास घेत नाहीत” असे सांगितले होतं. यानंतर कर्मचाऱ्यांनी रिंपलला वीणाला डॉक्टरांकडे किंवा हॉस्पिटलकडे घेऊन जायचं आहे का? असंही विचारले आणि तिला तिच्या नातेवाईकांना सांगण्यास सांगितलं. परंतु, तिने त्यांना हाकलून दिलं आणि मी मॅनेज करेन असं म्हणाली.

वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल…
मुंबईतील लालबाग चाळीत राहणाऱ्या आरोपी रिंपलने पोलिसांच्या चौकशीत कबूल केले की, मृतदेहाचे तुकडे २ महिने घरात ठेवल्याने दुर्गंधी येऊ लागली होती. यामुळे ही दुर्गंधी दूर करण्यासाठी तिने चहाची पाने, फिनाईल आणि एअर फ्रेशनरच्या तब्बल ४० बाटल्यांचा वापर केला. ही बाब उघड झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी पोलिसांनी आरोपी मुलगी रिंपल जैन हिला अटक केली.

याप्रकरणी अधिक चौकशीसाठी तिला सोमवारपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. आरोपी मुलगी रिंपलने पोलीस चौकशीत दिलेल्या माहितीनुसार, तिच्या आईच्या मृत्यूनंतर तिने मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा मार्ग इंटरनेटवर शोधला आणि नंतर जवळच्या दुकानातून मार्बल कटर विकत घेतला.

Lalbaug Murder: आईला मारल्यानंतर खूप घाबरले, २ दिवस असंच ठेवलं मग…; चौकशीत रिंपलने सांगितलं सत्य
मृतदेह २ दिवस घरात ठेवल्यानंतर दुर्गंधी वाढू लागल्यावर पुन्हा इंटरनेटवर वास जाण्यासाठी काय करावं हे तिने शोधलं. यानंतर तिने ऑनलाइन चहाची पानं, फिनाईल आणि एअर फ्रेशनर खरेदी करून त्यांचा वापर केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रिंपलने आपल्या बयाणात सांगितले की, गेल्या वर्षी २७ डिसेंबर रोजी तिची आई पायऱ्यांवरून पडून गंभीर जखमी झाली होती. याच्या २ दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला.

प्लॅस्टिकच्या पिशवीत महिलेचं अर्ध शरीर, बाजूला केसांचा झुपका; आणखी एका हत्याकांडाने पोलीस हादरले
रिंपलच्या म्हणण्यानुसार, आईच्या मृत्यूमुळे ती घाबरली होती. आईच्या हत्येचा आरोप आपल्यावरच पडेल असं तिला वाटत होतं. म्हणूनच तिने आईच्या मृतदेहाचे ५ तुकडे केले आणि पॉलिथिनमध्ये गुंडाळले. इतकंच नाहीतर मृतदेहाचे तुकडे करण्यासाटी तिने संगमरवरी कटर खरेदी केले. परंतु, मृतदेह पूर्णपणे कापला जात नसल्याने तिने चाकूचाही वापर केला.

मिळालेल्या माहितीनुसार, या प्रकरणी शुक्रवारी पोलिसांनी एका व्यक्तीचा जबाब नोंदवला आहे. या व्यक्तीला पोलिसांनी लखनऊ इथून ताब्यात घेतलं होतं. मात्र, आवश्यक चौकशीनंतर त्याला सोडून देण्यात आले. एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या व्यक्तीचा या घटनेशी थेट संबंध अद्याप समोर आलेला नाही. तरीही पोलिसांना माहिती न देता त्याला शहराबाहेर जाण्यास रोखलं आहे. ही व्यक्ती रिंपलच्या आधीपासून संपर्कात होती, अशीही माहिती समोर आली आहे.

Crime Diary : रिप्लाय नाही दिला तर मारेन, सुसाईड नोटही रागात लिहली की पेनाची निब तुटली; मृत्यूचं भयानक गुढ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here