दरम्यान, सोमवारी सकाळपर्यंत त्यांच्या पार्थिवावर लष्करी इतमामात अंत्यविधी होणार असल्याची माहिती मिळाली आहे.. त्यांच्या निधनाची बातमी गावात पोहचताच मानोरी बुद्रुक गावासह येवला तालुक्यात शोककळा पसरली आहे. शेळके यांच्या पश्चात वडील पत्नी, भाऊ, वहिनी असा परिवार आहे. सकाळपासूनच त्यांच्या राहत्या घरी नातेवाईक आणि हितचिंतकांनी सांत्वनासाठी गर्दी केली. वीर जवान अजित शेळके यांच्या दुर्दैवी मृत्य शेळके कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
नाशिकमध्ये शेतकऱ्यांना का थांबवलं नाही, ईडी सरकार असंवेदनशील | सुप्रिया सुळे
अजित शेळके यांच्या अपघाती मृत्यूनंतर माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांच्यानी श्रद्धांजली अर्पण केली आहे. येवला तालुक्यातील मानोरी बुद्रुकचे सुपुत्र वीरजवान अजित शेळके हे देशसेवेचे कर्तव्य बजावत असताना अपघातात शहीद झाले. त्यांच्या निधनाने तीव्र दुःख झाले. येवला तालुक्यातील ग्रामीण भागातून पुढे येऊन शिक्षण घेत सैन्यदलात भरती झालेले वीरजवान अजित शेळके यांनी सैन्यदलात अतिशय उत्कृष्ट कामगिरी बजावली. त्यांच्या निधनाने भारत मातेने एक वीर सुपुत्र गमावला आहे. मी व माझे कुटुंबीय शहीद जवान शेळके कुटुंबीयांच्या दुःखात सहभागी असून ईश्वर मृताच्या आत्म्यास चिरशांती देवो हीच प्रार्थना करतो, अशी भावना व्यक्त करत भुजबळ यांनी अजित शेळके यांना श्रद्धांजली अर्पण केली आहे.