२ लाख रुपये महिना पगार
मिळालेल्या माहितीनुसार, मुकेश अंबानींच्या शेफचा दर महिन्याचा पगार २ लाख रुपये आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, दिल्लीतील आमदारांचं वेतन दर महिन्याला ९० हजार रुपये आहे. अशात मुकेश अंबानीच्या या स्टाफची कमाई आमदारांहून अधिक आहे. रिपोर्टनुसार, अंबानींच्या अधिकतर स्टाफची सॅलरी एकसमानच आहे. अंबानींच्या काही स्टाफची मुलंही विदेशात शिक्षण घेत आहेत. स्टाफमधील काही लोकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी अंबानीही मदत करतात.
रिपोर्ट्सनुसार, मुकेश अंबानींना साधं जेवण आवडतं. ते शाहाकारी आहेत. अंबानी स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटीमध्ये शिक्षण घेत होते, तेव्हापासून त्यांची साध्या जेवणाला पसंती आहे. अँटिलियामध्ये काम करणारा जवळपास प्रत्येक कर्मचारी चांगला पगार घेतो. मुकेश अंबानी त्यांच्या स्टाफला सॅलरीसह इन्शुरन्स आणि एज्युकेशन अलाउंसदेखील देतात. मुकेश अंबानींचा ड्रायव्हर किंवा शेफ होणं सोपं नाही. त्यासाठी अनेक परीक्षा पास कराव्या लागतात. काही परीक्षा दिल्यानंतरच पुढे त्यांची निवड केली जाते.
एका रिपोर्टनुसार, अंबानींच्या ड्रायव्हरला महिन्याला २ लाख पगारानुसार वर्षाला २४ लाख रुपये मिळतात. एका खासगी कॉन्ट्रॅंक्टिंग फर्मद्वारे अंबानी कुटुंबासाठी ड्रायव्हर्स ठेवले जातात अशी माहिती आहे. अंबानी कुटुंबात काम करणारे शेफ, ड्रायव्हर्ससह गार्ड्स आणि हाउसकिपिंग स्टाफ सर्वांना इतर भत्ते आणि इन्शुरन्सही दिला जातो. जगातील श्रीमंतांच्या यादीमध्ये टॉपला असलेल्या अंबानीच्या घरात काम करणारे कोट्यवधींची कमाई करतात.