मोहजदेवढे येथील राखीव वनक्षेत्रात करण्यासाठी काही जण दबा धरून बसल्याची गोपनीय माहिती वन विभागाला मिळाली होती. त्यानंतर वनविभागाच्या पथकाने तातडीने या राखीव वनक्षेत्राकडे धाव घेतली. यावेळी या पथकाने शोध मोहीम हाती घेतली असता, एका ठिकाणी हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने जाळी लावली असल्याचे निदर्शनास आले. मात्र, वन विभागाच्या कर्मचाऱ्यांचा सुगावा लागताच ही जाळी लावणाऱ्या व्यक्ती अंधाराचा फायदा घेऊन येथून पळून गेल्या. तर, घटनास्थळी शिकारीसाठी लावलेल्या जाळीमध्ये एक चिंकारा जातीचे हरीण अडकल्याचे वनविभागाच्या पथकाने निदर्शनास आले. हे हरीण मृत झाले होते. वन विभागाने घटनास्थळावरून शिकारीसाठी लावण्यात आलेली जाळी व मृत हरीण ताब्यात घेतले आहे. तसेच वन विभागाने या प्रकरणी अज्ञात व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
आरोपींचा शोध सुरू
‘मोहजदेवढे येथील वन क्षेत्रामध्ये हरणाची शिकार करण्याच्या उद्देशाने तीन जण आले होते. त्यांनी लावलेल्या जाळीमध्ये एका चिंकारा जातीच्या हरणाचा अडकून मृत्यू झाला आहे. हे हरीण साधारण दोन वर्षाचे आहे. संबंधित अज्ञात आरोपींच्या विरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. या आरोपींचा शोध घेण्यात येत आहे ,’ अशी माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी शिरीष निरभवणे यांनी दिली.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
I used to be able to find good info from your blog posts.
I am regular visitor, how are you everybody? This article posted at this web site is in fact pleasant.
A big thank you for your article.
Thank you ever so for you article post.
Like!! I blog quite often and I genuinely thank you for your information. The article has truly peaked my interest.