शिरूर: पुणे-नगर महामार्गावर न्हावरे फाट्यावर एका मद्यधुंद कार चालकाने दुचाकीला धडक दिली. धडक दिलेली दुचाकी ही रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या गॅस कंटेनरवर जाऊन आदळली. या अपघातात दोघांचा वाहनाच्या मध्ये चिरडून जागेवरच मृत्यू झाला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती. हे दोघेही जिवलग मित्र असल्याची माहिती समोर आली आहे. शनिवारी रात्री साडे दहाच्या सुमारास हा अपघात घडला आहे.

नीलेश हैबती थिटे (वय २९) आणि शिवाजी अरूण जवळगे (वय २९, दोघे रा. प्रितम प्रकाश नगर, शिरूर) अशी या अपघातात मृत झालेल्या मित्रांची नावे आहेत. घटनेनंतर मोटार चालक विजय बाळासाहेब रानवडे याला अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर आज शिरूर येथे मोठ्या जनसमुदायाच्या उपस्थितीत अंत्य संस्कार करण्यात आले. याबाबत प्रताप महाजन यांनी फिर्याद दिली आहे.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, शनिवारी सायंकाळी दिवसभराची कामे आटोपून निलेश आणि शिवाजी शिरूर येथे आपल्या घरी येत होते. ते न्हावरे फाट्याजवळ असणाऱ्या एका हॉटेल समोर नगरच्या दिशेने जाणाऱ्या एका भरधाव मोटार क्र. एम एच १२ एन यू ४९६५ हिने यांच्या दुचाकीला धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, या दोघांची दुचाकी समोर रस्त्याच्या कडेला उभ्या असणाऱ्या गॅस कंटेनरवर आदळली. यात निलेश आणि शिवाजी यांना गंभीर मार लागल्याने त्यांचा यात जागेवरच मृत्यू झाला.

नीलेश थिटे आणि शिवाजी जवळगे हे एकमेकांचे जिवलग मित्र होते. शिवाजी जवळगे हा कुरिअरचे काम करायचा तर निलेश थिटे हा इतर छोटी – मोठी कामे करत असत. कामानिमित्त दोघेही सोबत कारेगाव येथे गेले होते. तिकडून परतत असताना ही दुर्घटना घडली आहे. जवळगे याचे कुरिअरचे काम असल्याने काल सायंकाळी दोघे कारेगाव येथे गेले होते.

मामा तेरा क्या कहना! लग्नात भाचीला ३ कोटींच्या भेटवस्तू, ८१ लाख रोकड, ४० तोळं सोनं अन् बरंच काही
जीवनामध्ये एकमेकांच्या साथीने राहायचे असे स्वप्न मनाशी बाळगलेल्या दोन मित्रांच्या मैत्रीचा शेवट एकत्र झाला. त्यामुळे संपूर्ण शिरूर तालुका हळहळला आहे. अनेक मित्रांना या दोघांचे जाण्याने धक्का बसला आहे. यांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे.

ऊसतोड कामगाराच्या ५ वर्षांच्या लेकरानं अखेर बोअरवेलमध्येच जीव सोडला; एनडीआरएफचे आठ तासांचे प्रयत्न निष्फळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here