बिहारचे पोलीस अधीक्षक विनय तिवारी हे मुंबईत आले आहेत. गोरेगावच्या राज्य राखीव पोलीस दलाच्या विश्रामगृहात ते थांबले होते. महापालिकेला ही माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी विश्रामगृहावर जाऊन त्यांना क्वॉरंटाइन केले. तिवारी हे देशांतर्गत प्रवासी असल्याने नियमानुसार ही कार्यवाही करण्यात आल्याचं महापालिकेचं म्हणणं आहे. मात्र, भाजपनं यावरून मुंबई महापालिका व राज्य सरकारच्या हेतूवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे.
हेही वाचा:
भाजपचे आमदार व माजी खासदार यांनी सरकारवर प्रश्नांची सरबत्ती केली आहे. ‘सुशांतसिंह राजपूत प्रकरणात महाराष्ट्र सरकारची भूमिका सुरुवातीपासूनच संशयास्पद राहिली आहे. मुंबईत दररोज हजारो लोक येतात. याआधी बिहारचे काही पोलीसही आले होते. त्यापैकी कुणाला क्वारंटाइन केलं गेलं नाही. मग मोठ्या अधिकाऱ्यालाच क्वारंटाइन का केलं गेलं? मोठे अधिकारी या प्रकरणाच्या मुळाशी जातील आणि सत्य लोकांसमोर येईल. या भीतीपोटी त्यांना क्वारंटाइन केलं जात आहे, असा आरोप कदम यांनी केला आहे. ‘महाराष्ट्र सरकार मुंबई पोलिसांना मोकळेपणानं काम करू देत नाही. मुंबई पोलिसांना मोकळेपणानं काम करू दिलं असतं तर हे प्रकरण सीबीआयकडं सोपवा अशी मागणी देशभरातून झालीच नसती,’ असा दावाही कदम यांनी केला. ‘मुंबई पोलिसांना काम करू द्यायचं नाही. बिहार पोलिसांना सहकार्य करायचं नाही. सीबीआयला प्रकरण सोपवा ही मागणीही मान्य करायची नाही. हे सगळं करून महाराष्ट्र सरकारला नेमकं कोणतं सत्य दडवायचं आहे? मृत्यूच्या आदल्या दिवशी सुशांतच्या घरी जी पार्टी झाली, त्यात राज्य सरकारमधले बडे मंत्री उपस्थित होते. नेमकं खरं काय हे देशाला कधी कळणार? अशा गोष्टी लोकांच्या पुढं येतील म्हणून हा खटाटोप सुरू आहे का,’ असा प्रश्नही त्यांनी केला.
माजी खासदार किरीट सोमय्या यांनी मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह व मुंबई महापालिका आयुक्त आय. एस. चहल यांना पत्रच लिहिलं आहे. मुंबई व महाराष्ट्रात कामानिमित्त ये-जा करणारे किती मंत्री, उद्योगपती, पोलीस अधिकारी व अन्य लोकांना क्वारंटाइन करण्यात आलं आहे याची यादी द्या, अशी मागणी सोमय्या यांनी केली आहे. आयसीएमआरच्या पथकातील अधिकारीही मुंबई व महाराष्ट्रात अनेकदा येऊन गेले आहेत. त्यांनाही कधी क्वारंटाइन केलं गेलं नाही. मग बिहारच्याच पोलीस अधिकाऱ्याला का, अशी विचारणा सोमय्या यांनी पत्राद्वारे केली आहे. विनय तिवारी यांना तात्काळ क्वारंटाइनमुक्त करा, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
Marathi News: मराठी बातम्या, Latest News in Marathi, Breaking Marathi News, Marathi News Paper | Maharashtra Times
Thanks so much for the blog post.
I like this website very much, Its a very nice office to read and incur information.
Thank you ever so for you article post.
A big thank you for your article.
Like!! Great article post.Really thank you! Really Cool.