सातारा :सातारा डायग्नोस्‍टीक सेंटर ॲन्‍ड मल्‍टीस्‍पेशालिटी हॉस्‍पिटलला त्‍यांच्याच स्‍टाफने तब्बल ६२ लाख ७७ हजार ५४२ रुपयांना ‘चुना’ लावल्‍याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी चौघांवर शहर पोलिस ठाण्यात गुन्‍हा दाखल झाला आहे.

नीलेश भानूदास नाईक उर्फ इग्नसी सॅनटन फर्नांडिस, प्रिया नीलेश नाईक (दोन्‍ही वाई), सर्जिमेड एजन्‍सीचे रविकिरण विलास पाटील (रा.मंगळवार पेठ, सातारा), अजित रामचंद्र कुलकर्णी (रा.यादोगाेपाळ पेठ, सातारा) यांच्यावर गुन्‍हा दाखल झाला आहे. याप्रकरणी हॉस्‍पिटलचे विक्रमसिंह शिंदे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

मध्यरात्री घरात घुसले, महिलेला चाकूचा धाक दाखवून जबरी चोरी, नागरिकांमध्ये भितीचे वातावरण
या प्रकरणाबाबत मिळालेली माहिती अशी की, हॉस्‍पिटलच्या अखत्‍यारित मेडीकल स्‍टोअर चालवण्यात येत असून त्‍याची जबाबदारी नीलेश नाईक याची नेमणूक केली होती. मेडीकलच्या आर्थिक व्‍यवहाराच्या नोंदी ठेवण्याचे काम प्रिया नाईक करत होत्‍या. मेडीकलसाठी आवश्यक असणारी औषधे व इतर साहित्‍य विविध ठिकाणावरुन खरेदी केली जात होती. प्रत्‍येकवर्षी मेडीकलमधील शिल्‍लक औषध साठा व विक्रीचा ताळमेळ तपासला जात असताना त्‍यात तफावत असल्‍याचे हॉस्‍पिटल प्रशासनाच्या निदर्शनास आले.

ही दंडेलशाही आमच्याकडे चालणार नाही; बाळासाहेब थोरात यांचा विखेंना सज्जड इशारा
हॉस्‍पिटल प्रशासनाने औषधे खरेदी-विक्री सॉफ्‍टवेअरची तपासणी केली असता त्‍यामध्ये धक्‍कादायक बाबी समोर आल्‍या. यामध्ये काही व्‍यवहाराच्या नोंदी डिलीट झालेल्‍या होत्‍या, तर काही नोंदीत बदल करण्यात आलेले होते. विक्रीतून जमा झालेली रक्‍कम जमा केलेली नव्‍हती.

पुरवठादारांना औषधे परत केल्‍याच्या बनावट पावत्‍या करणे. जमा आणि रजिस्‍टरमधील आर्थिक नोंदीत तफावत असणे. तसेच बँकेत रोकड कमी भरल्‍याचे निदर्शनास आले. याप्रकरणी संशयित चौघांचा समावेश असल्‍याचे स्‍पष्ट झाले. त्‍यानुसार हॉस्‍पिटल व्‍यवस्‍थापनाच्यावतीने फसवणूकीची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आली.
सावरकर समझा क्या…; राहुल गांधींच्या फोटोसह काँग्रेसचा ट्विटद्वारे टोला, रिजिजू म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here