सातारा: शिवसेनेचे माजी सातारा जिल्हा संपर्कप्रमुख मदन कदम यांनी केलेल्या गोळीबारात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एकजण गंभीर जखमी झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी मदन कदम यांना ताब्यात घेतलं असून या प्रकणाचा तपास सुरु आहे.

ठाणे महापालिकेचे माजी नगरसेवक आणि शिवसेनेचे माजी संपर्कप्रमुख मदन कदम यांनी पाटण तालुक्यातील मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरात केलेल्या गोळीबारात दोन जणांचा मृत्यू झाला आहे. तर, या गोळीबारात एक जण जखमी झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. गोळीबार प्रकरणी मदन कदम यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

१३ कोटींचा बंगला अन् महागड्या गाड्या; एक चूक अन् १०० कोटींचा मालक रस्त्यावर आला
पवनचक्कीमधील पैशांच्या हिशोबावरून वाद झाल्याने गोळीबार केल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. या घटनेने राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. मदन कदम हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात आहेत. या घटनेची माहिती मिळताच पोलीस फौजफाटा घटनास्थळाकडे रवाना झाला आहे. मोरणा खोऱ्यातील गुरेघर धरण परिसरातील स्थानिकांनी मदन कदम यांच्या घराभोवती वेढा दिला आहे.

गोळीबारात मृत्यू झालेला एकजण सातारा आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री आणि उत्पादन शुल्कमंत्री शंभूराज देसाई यांचा कार्यकर्ता असल्याची माहिती आहे. गोळीबार झाल्याने पाटण तालुक्यात तणावाचे वातावरण तयार झाले आहे. त्यामुळे पोलिसांनी परिसरात कडक बंदोबस्त ठेवला आहे.

बॉयफ्रेंडसोबत मिळून भावाला संपवलं, शरीराचे तुकडे करुन फेकले; कर्नाटकातील हत्याकांडाचं नाशिक कनेक्शन

मला राजकारणातून संपवण्यासाठी अनिल परबांना पाठवलं, एकनाथ शिंदेंच्या सभेपूर्वी योगेश कदमांचे आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here