याबाबतची अधिक माहिती अशी की, दौंड तालुक्यातील पारगाव येथे आदित्य याचे मेडिकल स्टोअर आहे. तो एका मोठ्या शेतकरी कुटुंबातील मुलगा होता. आई-वडिलांना एकुलता एक असल्याने कुटुंबाने लाडात त्याला वाढवले होते. काही महिन्यांपूर्वीच त्याचे लग्नदेखील झाले होते. मात्र आता त्याने टोकाचा निर्णय घेऊन आपले जीवन संपवले.
आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आपल्या व्हॉट्सअॅप स्टेट्सवर स्वतःचे जवळपास ११ फोटो ठेवले होते. त्यातील शेवटच्या फोटोला ‘भावपूर्ण श्रद्धांजली’ असं लिहीत त्याने धावत्या रेल्वेखाली येऊन जीव दिला. त्याच्या जाण्याने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला असून एकुलता एक गेल्याने आई-वडिलांना मोठा धक्का बसला आहे.
दरम्यान, तरुणाच्या जाण्याने संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. या प्रकरणी पोलिसांकडून तपास सुरू असून तरुणाच्या आत्महत्येमागील कारणाचा शोध घेतला जात आहे.