WTI कच्च्या तेलाची किंमत ०.४५ टक्के वाढून प्रति बॅरल $६७.२६ वर व्यापार करत आहे. त्याचवेळी, ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत १.१७ टक्क्यांनी वाढून $७३.२८ प्रति बॅरलवर विक्रीसाठी उपलब्ध आहे. या दरम्यान, तेल कंपन्यांनी सोमवार, २० मार्च २०२३ रोजी पेट्रोल आणि डिझेलचे नवीन दर जाहीर केले असून नव्या किमतीनुसार वाहन इंधनाच्या दरात कुठेही बदल झालेला नाही.
दरम्यान, राष्ट्रीय स्तरावर मे २०२२ पासून पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती अपरिवर्तित राहिल्या आहेत. अशा परिस्थितीत कच्चे तेल स्वस्त होऊनही भारतात पेट्रोल डिझेलचे दर का कमी होत नाहीत आणि तेल कंपन्या किती काळ दर स्थिर ठेवतील, असा प्रश्न उपस्थित होत आहे. २१ मे २०२२ रोजी केंद्र सरकारने पेट्रोल आणि डिझेलवरील उत्पादन शुल्क कपात केली होती. सरकारने पेट्रोलवरील उत्पादन शुल्कात ८ रुपये तर डिझेलवर ६ रुपये कपात केली होती. देशाची आर्थिक राजधानी मुंबईत एक लिटर पेट्रोल १०६.३१ रुपये तर डिझेलसाठी प्रति लिटर ९४.२७ रुपये मोजावे लागतील.
पेट्रोल-डिझेलच्या किमती
आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील क्रूडच्या आधारावर सरकारी तेल विपणन कंपन्या दररोज वाहन इंधनाच्या किमतींचा आढावा घेऊन दर निश्चित करतात. तुमच्या शहरातील पेट्रोल-डिझेलचे दर तुम्हाला एसएमएसद्वारे दररोज कळू शकतात. राज्यस्तरीय करांमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर राज्यानुसार वेगवेगळे असतात.