woman poisoned while spraying banana crop, महिलेची १५ दिवसांची मृत्यूशी झुंज ठरली अपयशी, केळीच्या बागेत घडली होती भयंकर घटना – woman poisoned while spraying banana crop died after fifteen days in nandgaon jalgaon
जळगाव : तालुक्यातील नंदगाव येथील महिलेला केळी पिकावर फवारणी करत असताना विषारी औषध डोळ्यात व अंगावर पडल्याने विषबाधा झाली होती. या महिलेचा उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी साडेआठ वाजता मृत्यू झाला आहे. जिजाबाई विश्वनाथ सोनवणे (वय-५५, रा.नंदगाव ता. जि. जळगाव) असे मृत महिलेचे नाव आहे. याबाबत जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
जळगाव तालुक्यातील नंदगाव येथे जिजाबाई सोनवणे या पत्नी, मुले या आपल्या परिवारासह वास्तव्याला होत्या. शेतीचे काम करून त्या आपल्या उदरनिर्वाह करत होत्या. २ मार्चला जिजाबाई ह्या नेहमी प्रमाणे मुलगा गजानन सोबत शेतात गेल्या. सकाळी ९ ते दुपारी ४ वाजेच्या दरम्यान नंदगाव शिवारात काम करत होत्या. गजाजन हा शेतातील केळीवर अळी नाशकाची फवारणी करत होता. तर जिजाबाई ह्या फवारणी पंप भरून देत होत्या. फवारणीचे औषध डोळ्यात व अंगावर पडून विषबाधा
घरी आल्यानंतर जिजाबाई यांना अचानक चक्कर आले. शेतात काम करताना दिवसभरात फवारणीचे औषध त्यांच्या डोळ्यात व अंगावर पडून त्यांना विषबाधा झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर जिजाबाई यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलविण्यात आले होते. उपचार सुरू असताना शुक्रवारी जिजाबाई यांची मृत्यूशी सुरू असलेली झुंज अपयशी ठरली. सकाळी साडेआठ वाजता जिजाबाई यांचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नयन पाटील करीत आहे.