नवी दिल्ली : कर वाचवण्यासाठी ३१ मार्च २०२३ अंतिम मुदत अगदी जवळ आली असून त्यासाठी गुंतवणूक करायची असेल तर त्या आधी गुंतवणूक करू शकता. आणि जर तुम्ही गुंतवणूक केली नसेल तर तुम्हाला जास्त कर भरावा लागेल. योग्य ठिकाणी गुंतवणूक केल्याने कर दायित्व कमी होते. अशा परिस्थितीत नक्की कुठे गुंतवणूक केल्याने कर दायित्व कमी होऊ शकते हे जाणून घेऊ.

गुंतवणुकीवर कर बचत
अशा अनेक गुंतवणूक योजना आहेत. ज्यामुळे करदात्यांना कर सवलत मिळते. आयकर कायद्याच्या कलम ८०सी अंतर्गत तुम्हाला १.५ लाखांपर्यंतच्या गुंतवणुकीवर कर भरावा लागत नाही. यामध्ये पब्लिक प्रॉव्हिडंट फंड (पीपीएफ), कर्मचारी भविष्य निर्वाह निधी, इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम, राष्ट्रीय पेन्शन प्रणाली (एनपीएस), सुकन्या समृद्धी योजना (एसएसवाय), ज्येष्ठ नागरिक बचत योजना (एनएससी), मुदत ठेवी यारख्या अनेक योजना आहेत. ज्यात तुम्हाला गुंतवणुक केल्यास तुम्हाला कर सवलत मिळू शकते.

करदात्यांसाठी शेवटची संधी! वेळेत उरकून घ्या ‘हे’ काम, अंतिम संधी चुकली तर नाही मिळणार सवलत
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी
तुम्ही तुमच्या नावाने सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी खाते उघडू शकता. पीपीएफ वर सध्याचा व्याज दर वार्षिक ७.१% आहे. याव्यतिरिक्त पीपीएफ योजना आयकर कायद्याच्या कलम ८०सी नुसार योजनेत जास्तीत जास्त १.५ लाख रुपयांचे योगदान करू शकता. मॅच्युरिटी रकमेवरही कर सूट उपलब्ध आहे. योजनेचा परिपक्वता कालावधी १५ वर्षे असून तुम्ही ५-५ वर्षांसाठी मुदत वाढवू शकता. तुम्ही ७ वर्षांनंतर या योजनेतून आंशिक पैसे काढू शकता आणि ४ वर्षांनंतर कर्ज घेऊ शकता.

घर भाड्याने देणे आहे… फक्त करबचत करण्यासाठी भाडेकरार करताना लक्षात ठेवा या महत्वाचा गोष्टी
सुकन्या समृद्धी योजना
ही योजना खास मुलींसाठी चालवली जाते. या योजनेत १० वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलीच्या नावाने खाते उघडता येते. या योजनेचा लाभ जास्तीत जास्त दोन मुलींसाठी घेता येतो. मुलगी १८ वर्षांची झाल्यावर तिला खात्याची मालकी मिळते. या योजनेवर सध्या ७.६ टक्के दराने व्याज दिला जातो. तर या योजनेत सामील होण्यासाठी तुम्ही किमान २५० रुपयांपासून सुरूवात करता येते. तर जास्तीत जास्त १,५०,००० रुपये वार्षिक जमा केले जाऊ शकतात.

ज्येष्ठ नागरिक बचत योजना
या योजनेसाठी ६० वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची कोणतीही सेवानिवृत्त व्यक्ती ज्येष्ठ नागरिक बचत योजनेत गुंतवणूक करू शकते. त्याची गुंतवणूक कालावधी कमाल पाच वर्षे असून या योजनेत किमान गुंतवणुकीची मर्यादा १,००० आणि कमाल गुंतवणुकीची मर्यादा १५ लाख आहे. मॅच्युरिटी कालावधीनंतर तो तीन वर्षांसाठीही वाढवता येतो. केंद्र सरकार ज्येष्ठ नागरिक बचत योजनेवर वर्षाला ८ टक्के व्याजदर देते. खातेदार आयटीआर भरताना कलम ८०सी अंतर्गत कर सूट मागू शकतात.

राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र
या पोस्ट ऑफिस स्कीममध्ये तुम्हाला एकाच वेळी गुंतवणूक करावी लागते. तुम्हाला मुदतपूर्तीनंतर मुद्दल आणि व्याजाची रक्कम मिळते. त्याचा कार्यकाळ पाच वर्षांचा आहे. किमान गुंतवणूक १,००० असून मॅच्युरिटीवरील एकूण व्याज करपात्र आहे. परंतु वार्षिक व्याज पहिल्या चार वर्षांतच योजनेमध्ये पुन्हा गुंतवले जाते. अशा परिस्थितीत ते स्वतंत्र गुंतवणूक म्हणून मानले जाते आणि ८०सी अंतर्गत कर सूट मिळते.

कर वाचविण्यासाठी म्युच्युअल फंडात गुंतवणूक करताय, पैसे गुंतवताना ‘या’ चुका टाळा
पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना (फिक्स्ड डिपॉझिट)

पोस्ट ऑफिस मुदत ठेव योजना काही प्रमाणात बँकेच्या मुदत ठेवीसारखीच आहे. यात १, २, ३ आणि पाच वर्षांसाठी गुंतवणूक करता येते. तसेच जेव्हा ठेव पाच वर्षांसाठी असेल तेव्हाच तुम्हाला त्याच्या व्याजावर ८०सी अंतर्गत कर सूट मिळते. वेगवेगळ्या कालावधीसाठी वेगवेगळे व्याजदर लागू होतील. किमान गुंतवणुकीची रक्कम १,००० असून कमाल मर्यादेसारखी कोणतीही मर्यादा नाही. परंतु तुम्हाला फक्त १.५ लाखांपर्यंतच कर लाभ मिळतो. तुम्हाला यावर ६.७% व्याज मिळेल.

राष्ट्रीय पेन्शन प्रणाली
सेवानिवृत्ती निधी तयार करण्यासाठी एनपीएस ही एक उत्तम गुंतवणूक आहे. या योजनेत गुंतवणूक केल्यास तुम्हाला दोन लाखांपर्यंत थेट कर सूट मिळते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here