पुणे : शिरूर तालुक्याचे माजी आमदार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे अत्यंत जवळ असणारे पोपटराव गावडे यांची प्रकृती बिघडली. त्यांना पुण्यातील रुबी हॉलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

रविवारी सकाळपासून पोपटराव गावडे हे कार्यक्रमात होते. मात्र दुपारच्या वेळी त्यांना अचानक छातीत दुखू लागले. यानंतर त्यांना शिरूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, बिघडलेली प्रकृती बघून डॉक्टरांनी त्यांना पुण्याला हलवण्याचा सल्ला दिला. याबाबत माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांना माहिती मिळाली. वळसे पाटील यांनी पुण्यातील रुबी हॉल रुग्णालय प्रशासनाला पोपटराव गावडे यांच्या प्रकृती विषयी कल्पना दिली. आणि गावडे यांना शिरूर वरून रुबी हॉल रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉ. हिरेमठ हे त्यांच्यावर उपचार करीत आहेत. सध्या पोपटराव गावडे यांची प्रकृती स्थिर आहे. आणि काळजी करण्याचे कुठलेही कारण नसल्याचे सांगण्यात आले आहे. गावडे यांची अँजिओग्राफी झाली आहे. सध्या त्यांना यसीयूमध्ये डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आलं आहे. त्यांचा मुलगा राजेंद्र गावडे हे देखील त्यांच्या सोबत आहेत. त्यांच्याकडून ही माहिती मिळाली आहे.

जनतेचे आभार, भाजपला टोला; किस्सा सांगत आमदार रवींद्र धंगेकर म्हणाले प्रेम संपत नाही


पोपटराव गावडे हे शरद पवार यांचे अत्यंत निष्ठावंत मानले जातात. त्यांचा राजकीय प्रवास शरद पवार यांनी पुढे नेला. पक्षाशी एकनिष्ठ म्हणून त्यांची ओळख आहे. दिलीप वळसे पाटील आणि पोपटराव गावडे हे जुने सहकारी आहेत. छातीत अचानक त्रास होऊ लागल्याने त्यांना रुग्णालयात दाखल केले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

Pune : घरची परिस्थिती हलाखीची, नोकरीला रामराम ठोकला अन् शेतकऱ्याचा मुलगा बनला DYSP

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here