नवी दिल्ली : जगभरात बँकिंग संकटांमुळे सराफा बाजारात तेजीने कामकाज होताना दिसत आहे. तसेच देशातील वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर सोन्याचे भावही कमी होण्याचे नाव घेत नाहीत. त्यामुळे सर्वसामान्यांसाठी सोने खरेदी करणे दिवसेंदिवस महाग होत आहे. तर सोन्यात गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना खूप फायदा होत आहे. सोमवारी एमसीएक्सवर सोन्याचा भाव वाढून आत्तापर्यंतच्या सर्वकालीन उच्चांकावर झेपावला आहे. आज आठवड्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी, एमसीएक्सवर (MCX) सोन्याचा भाव सकाळी ११.३० च्या सुमारास ५९ हजार ४९६ रुपये प्रति १० ग्रॅम या दिवसाच्या उच्चांकावर पोहोचला आहे.

मागील काही दिवसांच्या जागतिक घडामोडीचा पार्श्वभूमीवर सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. जर तुम्ही सध्या सोन्यात गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तुम्हाला नफा होऊ शकतो. पण जर तुम्ही सोन्याचे दागिने खरेदीचा विचार करत असाल तर तुमच्यासाठी घाट्याचा सौदा ठरू शकतो. सध्या सोन्या-चांदीच्या बाजारात तेजीचा कल आहे असून अमेरिका आणि युरोपसह संपूर्ण जगाचा शेअर बाजार हादरला आहे. त्यामुळे सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सोन्याच्या किंमतींनी ५९ हजारांच्या पुढे उसळी घेतली आहे.

करदात्यांनो, आता थोडेच दिवस शिल्लक, जाणून घ्या कर बचतीच्या जबरदस्त गुंतवणूक टिप्स!
सोने-चांदीचा आजचा भाव काय आहे?
भारतीय बाजारात मौल्यवान धातूंमध्ये संमिश्र व्यवहार होताना दिसत असून मल्टी कमोडिटी एक्स्चेंजवर (MCX) सोन्याचा तेजीने व्यवहार सुरू असताना सोमवार, २० मार्च रोजी चांदीने घसरण नोंदवली आहे. ५ एप्रिल २०२३ रोजी परिपक्व होत असलेल्या सोन्याच्या फ्युचर्समध्ये एमसीएक्सवर ५४ रुपये किंवा ०.०९ टक्क्यांनी किंचित वाढ झाली आणि ५९,४४६ रुपये प्रति १० ग्रॅमवर व्यवहार होत आहे. तर ५ मे २०२३ रोजी परिपक्व होणाऱ्या चांदीचे फ्युचर्स १९१ रुपये किंवा ०.२८ घसरून ६८,३९४ रुपये प्रति किलोवर व्यवहार करत आहे.

लग्नासाठी पैसे कमी पडणार नाहीत, आता प्रत्येक लग्न होणार थाटामाटात; जाणून घ्या भन्नाट ऑफर
दरम्यान, जागतिक कमोडिटी बाजारातील हालचालींमुळे सोन्याच्या दरात जोरदार ॲक्शन होत असल्यामुळे सराफा बाजारातही सोन्याचे भाव वाढले आहेत. याशिवाय १७ मार्च रोजी बाजार बंद झाला तेव्हा सोन्याचा भाव ५९ हजार ३८३ रुपये प्रति १० ग्रॅम तर चांदीची किंमत ६८,५०१ रुपये प्रति किलो होती. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीच्या दरात मोठी उसळी पाहायला मिळत आहे. कोमॅक्सवर, सोने प्रति औंस १९७८ डॉलर तर चांदीची किंमत प्रति औंस २२.४६ डॉलरवर व्यापार करत होती.

प्रवास विम्याच्या या सुविधांबद्दल तुम्हाला माहित्येय का? जाणून घ्या महत्वाच्या गोष्टी
सोन्याचा भाव ६० हजार पार जाणार
२ फेब्रुवारी रोजी यापूर्वी सोन्याच्या किमतींनी विक्रमी वाढ नोंदवली होती, तर गेल्या महिन्यात सोन्याच्या दरात घसरण झाली होती. त्यामुळे सर्वसामान्यांना सोने खरेदीत काहीसा दिलासा मिळाला असून मात्र, मार्च महिन्यात सोन्याच्या दरात पुन्हा वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीला सोने ५५ हजारांच्या जवळपास ट्रेड करत होते तर आता येत्या काही दिवसांत सोन्याचा भाव ६० हजारांचा टप्पा ओलांडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here