नवी दिल्ली : बिस्लेरी इंटरनॅशनलचे चेअरमन रमेश चौहान यांची मुलगी जयंती चौहान आता बिसलेरी इंटरनेशनल कंपनीच्या प्रमुख असतील. टाटा कंझ्युमर प्रोडक्ट्स लिमिटेड (TCPL) सोबत अधिग्रहणाची चर्चा संपुष्टात आल्यानंतर कंपनीने जयंती यांच्याकडे नेतृत्व सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. बिस्लेरीचे अध्यक्ष रमेश चौहान यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले की जयंती आमच्या व्यावसायिक टीमसोबत कंपनीच्या कामकाजाकडे लक्ष देईल आणि आता आम्हाला आमचा व्यवसाय विकायचा नाही.

जयंती चौहान (वय ४२) सध्या बिस्लेरी इंटरनॅशनल या तिच्या वडिलांनी प्रमोट केलेल्या आणि तयार केलेल्या कंपनीच्या उपाध्यक्षा आहेत. या प्रकरणाची माहिती असलेल्या लोकांनी सांगितले की त्या मुख्य कार्यकारी अँजेलो जॉर्ज यांच्या नेतृत्वाखालील व्यावसायिक व्यवस्थापन टीमसोबत काम करतील. रमेश चौहान यांनी अलीकडेच बिस्लेरी ब्रँड टाटा समूहाला ७,००० कोटी रुपयांना विकण्याचा निर्णय घेतला होता, मात्र, दोघांमध्ये कोणताही करार होऊ शकला नाही.

Tata Bisleri Deal: माशी शिंकली! बिस्लेरी खरेदीचा करार रखडला, काय आहे कारण?
जयंती यांचे बालपण
जयंती चौहान यांचे बालपण दिल्ली, मुंबई आणि न्यूयॉर्क सारख्या शहरात गेले आहे. हायस्कूलनंतर त्यांनी लॉस एंजेलिसमधील फॅशन इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन आणि मर्चेंडाइझिंग (FIDM) येथे प्रोडक्ट डेवलपमेंटचा अभ्यास केला. जयंती यांनी लंडन कॉलेज ऑफ फॅशनमधून फॅशन स्टाइलिंग आणि फोटोग्राफीचे शिक्षण घेतले आहे. जयंती यांनी अनेक आघाडीच्या फॅशन हाउसमध्ये इंटर्न म्हणूनही काम केले आहे. लंडन विद्यापीठाच्या स्कूल ऑफ ओरिएंटल अँड आफ्रिकन स्टडीज (SOAS) मधून त्यांनी अरबी भाषा शिकली.

बिस्लेरीच्या जयंती चौहान पुन्हा चर्चेत; IPLमध्ये मोठा डाव टाकला; २०२३पासून ‘मैदानात’ दिसणार
वडिलांचा व्यवसाय
वयाच्या २४व्या वर्षी जयंती चौहान आपल्या वडिलांसोबत बिसलरीच्या दिल्ली कार्यालयात कामास रुजू झाल्या होत्यात्यांच्या कामकाजाच्या सुरूवातीच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये जयंती यांनी बिस्लेरीच्या प्लांटचे नूतनीकरण आणि प्रक्रिया ऑटोमेशनवर लक्ष केंद्रित केले. त्यांनी कंपनीच्या मानव संसाधन विभागात (HR) तसेच विक्री आणि विपणन टीममध्ये महत्त्वपूर्ण बदल केले. २०११ मध्ये जयंती दिल्लीहून मुंबईत येथे शिफ्ट झाल्या. हिमालयाचे वेदिका नॅचरल मिनरल वॉटर, फिजी फ्रूट ड्रिंक्स आणि बिस्लेरी हँड प्युरिफायर्स व्यवसाय यासारख्या बिस्लेरीचे नवीन ब्रँड चालवण्यात त्यांचा मोलाचा वाटा होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here