जळगाव : रामानंद नगर परिसरातील एका भागात १९ वर्षीय युवतीने राहत्या घरामध्ये ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी घडली होती. एक तरुण तरुणीला माझ्याशी प्रेमसंबंध ठेवले नाही तर मी आत्महत्या करून घेईल आणि तुमच्या कुटुंबाला अडकवून टाकेल, अशा वारंवार धमक्या देत होता. या त्रासाला कंटाळूनच तरुणीने मृत्युला कवटाळले अशी माहिती पोलिसांच्या तपासात समोर आली असून या प्रकरणी रविवारी तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्या प्रकरणी अक्षय रामचंद्र सुरवाडे (रा. पिंप्राळा) या तरूणा विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.

वैष्णोदेवीच्या दर्शनाला गेलेल्या पतीची गर्भवती पत्नी पाहत होती वाट, तेवढ्यात आला रावसाहेब दानवेंचा फोन कॉल…

जळगाव शहरातील रामानंदनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत १९ वर्षीय तरुणी ही कुटुंबासह वास्तव्यास होती. तिचे अक्षय सुरवाडे या तरूणाशी प्रेमसंबंध होते. या प्रेम संबंधाबाबत तरुणीच्या आईला माहिती पडलं. त्यांनी मुलीची समजूत घातली व या पुढे तरुणापासून दूर राहायचे असे सांगितले. तर ज्या तरूणासोबत प्रेम संबंध होते, त्या तरुणालाही तरुणीच्या आईने यापुढे फोन करायचा नाही किंवा भेटायचं नाही, कुठलाच संपर्क ठेवायचा नाही असे बजावले होते.

आई शप्पथ! महिलेच्या पोटातून हे काय निघालं…; डॉक्टरांनी गाठ असेल म्हणून ऑपरेशन केलं अन् हादरलेच

तरुणीसह तिच्या मोठ्या बहि‍णीलाही दिल्या धमक्या…

मात्र, तरुणीच्या आईने बजावल्यानंतर हा तरुण अक्षय हा तरुणीला मोबाइलवर फोन करून तसेच प्रत्यक्ष भेटून प्रेमसंबंध ठेव नाही तर मी आत्महत्या करून घेईल आणि तुझ्या घरच्यांना सुध्दा मारून टाकेल, अशा धमक्या देत होता. मात्र, तरुणीने त्याला प्रेम संबंध ठेवण्यास नकार दिला. तर तो परत त्रास देत होता. एवढेच नाही तर अक्षय हा तरुणीच्या मोठ्या बहिणीला सुध्दा व्हॉट्सअपवर मेसेज पाठवून तुझ्या बहिणीला माझ्याशी बोलायला सांग नाहीतर तुम्हाला सर्वांना पाहून घेईल, अशी धमकी देत त्रास देत होता.

Crime Diary : पत्नीच्या डोळ्यासमोर होतं सगळं पण फसली; पतीचा मित्र, रक्ताने माखलेले कपडे अन् धाड…धाड…धाड
प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्यानंतरही अक्षयकडून फोनवर तसेच प्रत्यक्ष भेटून त्रास देणं सुरूच होत. या त्रासाला कंटाळून तरुणीच्या आईने ६ मार्च रोजी पोलिसात तक्रार दिली होती. तरीही अक्षय सुरवाडे हा तिला धमक्या देत असल्यामुळे तरुणी तणावात होती. अखेर याच त्रासाला कंटाळून तणावातून शनिवारी सकाळी ११ वाजता तरुणीने घरात कुणीही नसताना सुरवाडे याच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर तरुणीच्या आईने संपूर्ण हकीकत सांगत पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरून रविवार, दि. १९ रोजी दुपारी अक्षय सुरवाडे याच्या विरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Crime Diary: रोज थोडं-थोडं करून पतीला जीव घेतला, पुरावाही नाही ठेवला; वाचा सायलंट किलर ‘सौ’ची कहाणी…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here